महाराष्ट्र

मला अजून शिकायचंय लग्न करू शकत नाही, असे म्हणताच अल्पवयीन मुलीवर केले चाकूने वार

साताऱ्यात 16 वर्षीय शाळकरी मुलीने लग्नास नकार दिल्याने अल्पवयीन मुलीवर चाकूने वार करून जखमी करण्याचा धक्कादायक घटना साताऱ्यात घडली आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

प्रशांत जगताप | सातारा : साताऱ्यात 16 वर्षीय शाळकरी मुलीने लग्नास नकार दिल्याने अल्पवयीन मुलीवर चाकूने वार करून जखमी करण्याचा धक्कादायक घटना साताऱ्यात घडली आहे. याप्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी ओरिसा राज्यातील एका परप्रांतीय तरूणाला अटक केली आहे. या घटनेमुळे साताऱ्यात खळबळ उडाली आहे. विवेक नरहरी शेट्टी (वय २३, मूळ रा. ओरिसा, सध्या रा. करंजे पेठ) असे अटक करण्यात आलेल्या तरूणाचे नाव आहे.

पीडित 16 वर्षांची मुलगी 23 नोव्हेंबर रोजी सायंकाळी साडेपाच वाजता अपार्टमेंटच्या टेरेसवर अभ्यास करत होती. त्यावेळी विवेक हा तेथे गेला. 'तुझे माझ्यावर प्रेम आहे का? मला आता सांग आणि तू माझ्याबरोबर लग्न करणार आहेस का नाही? ते पण सांग', असे त्याने पीडित मुलीला विचारले. यावर मुलीने 'अजून मी लहान आहे. मला अजून शिकायचे आहे. माझ्या आई-वडिलांना असे काही केलेले आवडणार नाही. म्हणून मी तुझ्याबरोबर लग्न करू शकत नाही, असे उत्तर दिले.

त्यामुळे चिडलेल्या विवेक शेट्टी या संशयितांने तिला जवळ ओढून तिच्या गळ्यावर आणि पोटात चाकूने वार केले. युवती जखमी झाल्याने तिला तातडीने जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले. शाहूपुरी पोलिसांनी विवेक शेट्टीवर खुनाचा प्रयत्न करणे, पोक्सो, विनयभंग, आत्महत्येचा प्रयत्न करणे आदी कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

मनसेकडून 45 उमेदवारांची यादी जाहीर, अमित ठाकरे यांना माहीममधून संधी

मनसेची यादी जाहीर, 45 उमेदवारांची घोषणा, माहिममधून अमित ठाकरेंना उमेदवारी

महाराष्ट्र विधानसभेकरिता २८८ मतदारसंघासाठी आज राज्यातून ५७ उमेदवारांचे ५८ नामनिर्देशन पत्र दाखल

अभिजीत बिचुकले विधानसभा निवडणुकीच्या रिंगणात

निवडणुकीच्या तोंडावर भाजपला मोठा धक्का; आणखी एका बड्या नेत्याचा ठाकरे गटात प्रवेश