भूपेश बारंगे, प्रतिनिधी
वर्ध्या समुद्रपूर तालुक्यातून जाणाऱ्या नागपूर चंद्रपूर महामार्गांवरील काही अंतरावर अज्ञात वाहनाच्या धडकेत बिबट्या ठार झाल्याची घटना उघडकीस आली आहे. सदर घटनेची माहिती मिळताच वनविभागाच्या वनपरीक्षेत्र अधिकारी वैशाली बारेकर घटनास्थळी पोहचेल. या घटनेची घटनेचा पंचनामा केला. सदर मादी जातीचे बिबट अंदाजे 3 वर्षाचे असावे असे वनविभागकडून सांगण्यात आले.
अपघातस्थळी अज्ञात वाहनाने धडक दिल्याने बिबटच्या डोक्याला जबर जखमी झाल्याने जागेवरच बिबट्याच्या मृत्यू झाला. हा बिबट काही दिवसांपूर्वी नागरी लाडकी भागात असल्याची चर्चा होती, हाच बिबट या परिसरात आला असावा असा अंदाज व्यक्त केला जात आहे. या संदर्भात वन अधिकारी अधिक तपास करत आहेत.