महाराष्ट्र

ह्रदय पिळवटून टाकणारी घटना! चार महिन्याचे बाळ वाहत्या पाण्यात पडले अन्...

लोकल थांबली म्हणून चालत जाणाऱ्या महिलेसोबतच्या व्यक्तीच्या हातातून 4 महिन्यांचं बाळ निसटलं. वाहत्या पाण्यात पडून बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

कल्याण : मुंबईसह उपनगरांना मुसळधार पावासाने हजेरी लावली आहे. यामुळे लोकल पूर्णपणे विस्कळीत झाल्या आहेत. अशातच, हदय पिळवटून टाकणारी एक बातमी समोर येत आहे. लोकल थांबली म्हणून चालत जाणाऱ्या एका महिलेच्या हातातून 4 महिन्यांचं बाळ निसटलं. आणि वाहत्या पाण्यात पडून बाळाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

माहितीनुसार, अंबरनाथ रेल्वे स्थानकातून मुंबईच्या दिशेने रवाना झालेली लोकल दुपारच्या सुमारास तब्बल दोन तास कल्याण आणि ठाकुर्ली रेल्वे स्थानकाच्या दरम्यान उभी होती. लोकल पुढे जात नसल्याने काही प्रवाशी लोकलमधून उतरुन चालत ट्रॅकच्या बाजूने जात होते. त्यात प्रवास करणारी महिला आणि तिच्यासोबत असलेला व्यक्ती ट्रेनमधून उतरून जात होते. तेव्हा महिलेसोबत असलेल्या पुरुषाच्या हातातून चार महिन्यांचं बाळ पाण्यात पडल्याने वाहून गेलं आहे. यावेळी बाळाच्या आईचा आक्रोश हदय पिळवटून टाकणारा होता.

ही घटना घडल्यानंतर उपस्थितांमधील काही तरुणांनी पाण्यात उड्या मारून मुलाचा शोध घेण्याचा प्रयत्न केला. मात्र, बाळ मिळून न आल्याने सर्वत्र हळहळ व्यक्त करण्यात येत आहे.

Black circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी