महाराष्ट्र

Dombivli MIDC Blast: कंपनीच्या मालकाविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल

Published by : Dhanshree Shintre

काल डोंबिवली परिसरात मोठी दुर्घटना घडली. डोंबिवलीच्या एमआयडीसीत एका कंपनीत मोठा स्फोट झाल्याची घटना घडली. एमआयडीसीच्या फेज- २ मध्ये हा स्फोट झाल्यानं परिसरात एकच खळबळ उडाली आहे. स्फोटाची भीषणता इतकी गंभीर आहे की, आकाशात धुराचे लोट आणि आगीचे लोळ मोठ्या प्रमाणात पसरले होते. आता याच प्रकरणात डोंबिवली एमआयडीसी अमूदान कंपनी रिअ‍ॅक्टर स्फोट प्रकरणी कंपनी मालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मालती प्रदीप मेहता आणि मलय प्रदीप मेहता यांच्याविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

डोंबिवली एमआयडीसी फेज-2 मधील अनुदान या कंपनीत काल रिअ‍ॅक्टर स्फोट झाला होते. हा स्फोट अतिशय भीषण होता. कंपनीचा आजूबाजूच्या 4-5 कंपन्यांना देखील या स्फोटाची झळ बसली आहे. या परिसरातील इमारतीच्या काचांना देखील तडे गेल्याचं पाहायला मिळालं आहे. त्यामुळे या परिसरात भीतीचं वातावरण आहे. घटनास्थळी बचावकार्य सुरू असल्याची माहिती मिळत आहे.

दरम्यान, या दुर्घटनेत आतापर्यंत 64 जण जखमी झाले आहेत, तर 8 जणांचा मृत्यू झाला आहे. मात्र अद्याप देखील काहीजण कंपनीमध्ये अडकण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. यातील जखमींवर एम्स आणि नेपच्युन या खासगी रुग्णालयांमध्ये उपचार सुरू असल्याचे समजते. तर अपघातात मृत्युमुखी पडलेल्या व्यक्तींची नावे अद्याप समजू शकलेली नाहीत.

Aadesh Bandekar | Ganpati Aagman | बांदेकर कुंटुंबासोबत गणेशोत्सवानिमित्त खास गप्पा | Marathi News

Supriya Pathare | Ganpati Aagman | वाजत-गाजत सुप्रिया पाठारे यांच्या घरी बाप्पा आगमन | Marathi News

selfie With Bappa |पाहा तुमचा बाप्पा लोकशाही मराठीवर | Marathi News

Dagadusheth Ganpati | दगडुशेठ हलवाई गणपती बाप्पाचं मोठ्या उत्साहात आगमन | Marathi News

Tembha village Bappa | शहापूरमधील टेंभा गावात भाविकांनी साकारला स्वामी समर्थांचा देखावा