Crime Team Lokshahi
महाराष्ट्र

धक्कादायक! मित्राचे हातपाय बांधून विरारमध्ये 20 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार

पीडितेच्या तक्रारीनंतर अवघ्या दोन तासात पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

संदीप गायकवाड | विरार : वसई-विरारमधून धक्कादायक बातमी समोर येत आहे. सोबतच्या मित्राचे हातपाय बांधून 20 वर्षीय तरुणीवर सामुहिक अत्याचार केल्याची घटना उघड झाली आहे. विरार पूर्व साईनाथ परिसरातील पाच पायरीच्या डोंगरावरील जंगलात काल बुधवारी दुपारी साडेचार वाजता ही घटना घडली आहे. पीडितेच्या तक्रारीनंतर अवघ्या दोन तासात पोलिसांनी दोन आरोपींना बेड्या ठोकल्या आहेत. आरोपींना आज वसई न्यायालयात हजर केले असता 5 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे.

धीरज राजेश सोनी (वय 25) आणि यश लक्ष्मण शिंदे (वय 22) असे वासनांध आरोपींची नाव असून हे दोघेही विरार पूर्व साईनाथ नगर येथील रहिवासी आहेत. बुधवारी दुपारी 20 वर्षांची तरुणी आपल्या मित्रासोबत साईनाथ परिसरातील पाच पायरीच्या डोंगरावर फिरायला गेली होती. एकांतात मित्रमैत्रिणी बसलेले पाहून या वासनांध आरोपींनी पाहिल्यांदा या दोघांचे फोटो काढले. व त्यानंतर त्यांना ब्लॅकमेलिंग करत काही पैशांची मागणी केली. आपली बदनामी होऊ नये यासाठी मुलीच्या मित्राने आपल्या मित्राकडून 500 रुपयेही फोन पेवरून पाठवले. पण, एवढ्यावर आरोपी न थांबता त्यांनी चक्क पीडित तरुणीवर अत्याचार करण्यास सुरुवात केली. तेव्हा तरुणीच्या मित्राने त्यांना प्रतिकार केला.

तरुणीच्या मित्राने बियरची बॉटल आरोपीच्या डोक्यात घालून त्याला जखमी केले. तेव्हा संतापलेल्या आरोपींनी तरुणी व तिचा मित्र या दोघांचे मोबाईल हिसकावून घेऊन त्यांच्या सोबतची बॅगही जाळून टाकली. तरुणीच्या मित्राला मारहाण करत नग्न करून हातपाय बांधले. व तरुणीला बाजूच्या निर्जनस्थळी नेऊन तिच्यावर आळीपाळीने सामूहिक बलात्कार केला आहे. याप्रकरणी पीडितेने विरार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली. याची गंभीर दखल घेत पोलिसांनी अवघ्या दोन तासात आरोपींना बेड्या ठोकल्या.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news