महाराष्ट्र

अक्कलकोटमध्ये उभारली जाणार १०८ फूट उंचीची श्री स्वामी समर्थांची मूर्ती

राजघराण्याच्या राम तलाव या निसर्गरम्य परिसरात ४२ एकरात हा प्रकल्प साकारला जाणार असून या ठिकाणी १०८ फूट उंचीची श्री स्वामी समर्थांची मूर्ती स्थापना केली जाणार आहे.

Published by : Siddhi Naringrekar

राजघराण्याच्या राम तलाव या निसर्गरम्य परिसरात ४२ एकरात हा प्रकल्प साकारला जाणार असून या ठिकाणी १०८ फूट उंचीची श्री स्वामी समर्थांची मूर्ती स्थापना केली जाणार आहे. नवीन राजवाडा प्रांगणात शानदार समारंभात राजेशाही थाटात हा कार्यक्रम संपन्न झाला कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्या म्हणून श्रीमंत छत्रपती वृषाली राजे शिवाजी राजे भोसले (सातारा) श्रीमंत गोपाळ राजे पटवर्धन (मिरज), श्रीमंत नंदिता राजे घाटगे (कागल), श्रीमंत पद्मजाराजे पटवर्धन (मिरज) हे उपस्थित होते. कार्यक्रमाचा शुभारंभ श्री स्वामी समर्थांचे प्रतिमा पूजन आणि दीप प्रज्वलन करून करण्यात आला यावेळी सिने अभिनेते अशोक कुलकर्णी यांनी श्री स्वामी समर्थांची भूमिका साकारली आणि मनोगत व्यक्त केले.

यावेळी व्यासपीठावर श्रीमंत मालोजीराजे भोसले, श्रीमंत छत्रपती वृषाली शिवाजी राजे भोसले,श्रीमंत गोपाळ राजे पटवर्धन (मिरज), श्रीमंत पद्मजाराजे पटवर्धन (मिरज), श्रीमंत नंदिता राजे घाटगे (कागल), हे होते. श्रीमंत मालोजीराजे भोसले म्हणाले विख्यात शिल्पकार भगवान रामपुरे यांना श्री स्वामी समर्थांचा दृष्टांत झाला आणि तो दृष्टांत स्वामी नगरी अक्कलकोट मध्ये भव्य प्रमाणात साकारला जाणार आहे. यासाठी सर्व स्वामी भक्तांनी सहकार्य करावे असे आवाहन केले. तसेच अनुभूती प्रकल्पाचे वास्तुविशारद डॉ महेश नामपुरकर यांनी सदर प्रकल्पाचा मास्टर प्लॉन कसा घडवून आणला व तो किती तासामध्ये घडवून आणला याचे सविस्तर वर्णन केले. डॉ महेश नामपुरकर यांना सदरच्या जागेचा नकाशा पाहताचा स्वामी महाराज निद्रा स्थितीमध्ये दिसुन आले.

सदर प्रकल्प हा अक्कलकोट राजघराण्याची शहराच्या मध्य ठिकाणी असलेली जागा श्रीमंत मालोजीराजे भोसले यांनी निवडली आहे. सदर जागेची निवड श्री स्वामी महाराजांच्या दुष्टांतामुळे निवडली आहे. तसेच श्रीमंत मालोजीराजे भोसले यांना त्यांच्या कमी वयामध्ये एवढा मोठा प्रकल्प साकारला आहे. तसेच सदर प्रकल्पामधुन अक्कलकोट येथील नगरवासीयांना मोफत वैद्यकीय उपचाराची सेवा उपलब्ध करण्यात याणार आहे. सदर प्रकल्प ही अक्कलकोट गावाच्या प्रगतीची सुरूवात आहे. यावेळी अनुभूती या पुस्तकाचे प्रकाशन आणि अक्कलकोट राजघराण्याचा इतिहास या संकेतस्थळाचे उद्घाटन देखील करण्यात आले.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news