भारतानं श्रीलंकेसमोर विजयासाठी ८२ धावांचं लक्ष्य ठेवलं आहे. २० षटकात टीम इंडियाने ८ बाद ८१ धावा केल्या. त्यामुळे आता श्रीलंकेला विजयासाठी ८२ धावांचं माफक आव्हान मिळालं आहे.
प्रथम फलंदाजीसाठी आलेल्या टीम इंडियाची खराब सुरुवात झाली. कर्णधार शिखर धवन बाद झाल्यानंतर काही धावांच्या अंतरावर एका पाठोपाठ एक अशा वरच्या आणि मधल्या फळीतील मातब्बर फलंदाज बाद झाले. अखेर २० षटकात टीम इंडियाने ८ बाद ८१ धावा केल्या. त्यामुळे आता श्रीलंकेला विजयासाठी ८२ धावांचं माफक आव्हान मिळालं आहे. भारताकडून कुलदीप यादव याने नाबाद 23 धावा केल्या. तर श्रीलंकेचा गोलंदाज वानिदू हसरंगा याने सर्वाधिक चार विकेट घेतल्या. त्यापाठोपाठ कर्णधार दासुन शनाका याने दोन तर दुश्मंथा चमिरा, रमेश मेंडिस यांनी प्रत्येकी एक विकेट घेतल्या.