महाराष्ट्र

Money Heist | नाशिकच्या करन्सी नोट प्रेस मधून ५ लाखांच्या नोटा गायब

Published by : Lokshahi News

संपूर्ण देशात चलन छापणाऱ्या नाशिकच्या करन्सी नोट प्रेस मध्ये पाच लाख रुपये गायब झाल्याने गोंधळ उडालाय. गेल्या आठवड्यात हा प्रकार उघड झाला होता. याप्रकरणी गोपनीय चौकशी सुरू करत दोषी कर्मचारी शोधण्याचा प्रयत्न सुरू झालाय. रिझर्व बँकेच्या प्रेसमध्ये दोन हजाराच्या नोटा तर नाशिकच्या करन्सी नोट प्रेस मध्ये पाचशेच्या आणि दोनशेच्या नोटा सह सर्व छोट्या नोटांची छपाई केली जाते. या प्रेस मधून 200 आणि 500 रुपयाची छापलेल्या नोटाचे कागद गेल्या आठवड्यात गायब झाली होती. करन्सी नोट प्रेस मध्ये ज्या ठिकाणी छपाई होते त्या ठिकाणी सीसीटीव्ही कुठेच उपलब्ध नसल्यामुळे व्यवस्थापनाची कोंडी झाली आहे.

गेल्या आठवड्यापासून याबाबत गोपनीय चौकशी सुरूये. मात्र नेमके दोषी कोण? कोणी या नोटा गायब केल्या त्याचबरोबर कुठल्या युनिट मधून सफाई करताना हे पैसे गायब करण्यात आले. या बद्दलची माहिती अद्याप मिळू शकलेली नाही. एका युनिटमध्ये अडीचशे ते तीनशे लोकं काम करत असल्यामुळे कोणत्या शिफ्ट मधून कोणत्या वेळेस हे पैसे गायब झाले याचा शोध घेणे सुरू आहे.

या सिक्युरिटी प्रेसला सीआयएसएफ म्हणजे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्यूरिटी फोर्सची सुरक्षा आहे, असे असताना इतकी मोठी रक्कम काय झाल्याने प्रेसचा प्रत्येक काना कोपरा शोधला जातोय. हा प्रकार उघड झाल्यानंतर सीआयएसएफ सतर्क झालीये. पूर्वी कर्मचाऱ्यांची चेकिंग न करता येजा सुरवसे किंवा काही विशिष्ट नेत्यांना पदाधिकाऱ्यांना या मधून पूर्णपणे सुट दिली जात असे. मात्र आता प्रत्येक कर्मचाऱ्याची कसोशीने तपासणी करण्यात येते प्रत्येकाला आयकार्ड कंपल्सरी करण्यात आलेत. तसेच त्यांच्याजवळ असलेल्या लॉकरमध्ये मोबाईल ठेवणे आणि वापराची सुविधा काढून घेण्यात आलीये.

IPL Mega Auction 2025 Live: तिसरा महागडा खेळाडू! व्यंकटेश अय्यर

Sharad Pawar: महायुतीच्या 'त्या' प्रचाराचा मविआला फटका बसला...

Ulhas Bapat | लोकशाहीत विरोधीपक्ष नेता असणं का महत्त्वाचं? घटनातज्ज्ञ उल्हास बापट यांचं विश्लेषण

Rishabh Pant IPL Mega Auction 2025: श्रेयसचा विक्रम मोडत, आयपीएल लिलावात ऋषभ पंत ठरला पहिल्या सत्रातील रेकॉर्डब्रेक खेळाडू

Pune Congress | पुण्यात काँग्रेसचा सुपडा साफ ; तिन्ही विद्यमान आमदारांचा पराभव