एमपीएससीच्या विद्यार्थ्याच्या परीक्षेवरून सुरु असलेले आंदोलन मिटते, तेच आता गेल्या 8 महिन्यापासून नियुक्त्या रखडलेले 413 उमेदवार आंदोलन करण्याच्या तयारीत आहे. पुण्यात हे आंदोलन होणार असल्याची माहिती आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एमपीएससी आयोगाचा गोंधळ चव्हाट्यावर आला.
गेल्या 19 जून 2020 रोजी एमपीएससीच्या विद्यार्थ्यांचा निकाल लागला होता. यामध्ये 413 उमेदवारांची उपजिल्हाधिकारी, पोलीस उप अधिक्षक , प्रांताधिकारी पदावर निवड झाली होती. मात्र त्यांना नियुक्त्या देण्यात आल्या नव्हत्या. त्यामुळे गेल्या 8 महिन्यांपासून नियुक्त्या रखडलेल्या 413 उमेदवारांनी आक्रमक झाले आहेत. उद्या शानिवारी हे सर्व उमेदवार पुण्यात एकत्र येऊन येणार आहेत.
मुख्यमंत्र्यांना लिहले पत्र
महाराष्ट्र लोकसेवा आयोगानं जून 2020 ला राज्य सेवा परीक्षेचा अंतिम निकाल जाहीर केला होता. त्यामध्ये निवड झालेल्या उमेदवारांच्या 8 महिन्यांपासून विद्यार्थ्यांच्या नियुक्त्या रखडल्या आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांना त्या उमेदवारांनी पत्र लिहीलं आहे. नियुक्त्या देऊन न्याय द्यावा अशी मागणी त्यांनी केली आहे.