महाराष्ट्र

Maharashtra Corona | महाराष्ट्रात ४ हजार ६८८ रूग्ण कोरोनामुक्त

Published by : Lokshahi News

राज्यात दररोज सध्या ४ हजारापार नवीन कोरोनाबाधित आढळून येत आहेत. तर यापेक्षा जास्त रूग्ण कोरोनामुक्त होत आहेत. त्यामुळे ही दिलासादायक बाब आहे.

राज्यात ४ हजार ६८८ रूग्ण कोरोनातून बरे झाले आहेत. आजपर्यंत एकूण ६२,७२,८०० कोरोनाबाधित रूग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. यामुळे राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०३ टक्के एवढे झाले आहे. दिवसभरात राज्यात ४ हजार १९६ नवीन कोरोनाबाधित आढळून आले तर, १०४ करोनाबाधित रूग्णांचा आज राज्यात मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे. राज्यातील कोरोनाबाधित रूग्णांची एकूण संख्या ६४,६४,८७६ झाली आहे. राज्यात आजपर्यंत १३७३१३ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.

राज्य सरकारकडून निर्बंध जरी शिथिल करण्यात आले असले, तरी देखील मुख्यमंत्र्यांनी रूग्ण संख्या वाढल्यास पुन्हा लॉकडाउनचा इशारा देखील दिलेला आहे. शिवाय, तिसऱ्या लाटेचा धोका देखील तज्ज्ञांकडून वर्तवला गेलेला आहे.

Latest Marathi News Updates live: नवी मुंबईतील सभेत पंतप्रधान मोदी यांची काँग्रेसवर जोरदार टीका

Prashant Jagtap EXCLUSIVE | हडपसर वासियांसाठी पुढील 5 वर्षांचं व्हिजन काय? Maharashtrach Mahasangram

हरियाणा शिवसेना राज्यप्रमुख विक्रम सिंह यांना बिश्नोई गँगकडून धमकी

ट्रम्प प्रशासनात इलॉन मस्क यांना मिळालं महत्त्वाचं स्थान

Pankaja Munde Bag check | पंकजा मुंडेंच्या बॅगसह हेलिकॉप्टरची देखील तपासणी | Lokshahi Marathi