अमरावती पोलीस शहर आयुक्तालयात गेल्या 36 दिवसात 4 खून झाल्याची घटना घडल्याने अमरावती शहरात खळबळ उडालेली आहे. तर युवक काँग्रेसच्या शिष्टमंडळाने पोलीस आयुक्त नवीनचंद्र रेड्डी यांची भेट घेऊन शहरात कायदा व सुव्यवस्थाचा प्रश्न बिघडला असल्याचा आरोप केला आहे.
महाजनपुरा रहिवासी प्रेमराज ऊर्फ मोंटू गोळे व अजय वानखडे हे दोघे मित्र दुचाकीने जय स्तंभ चौकातून जात असताना चार ते पाच अल्पवयीन मुलांनी मोंटू गोळे याच्यावर चाकूंनी हल्ला केला, या हल्ल्याचा सीसीटीव्ही फुटेज उपलब्ध झाले आहे.
मोंटू याला नागपूर येथे उपचारासाठी नेत असताना त्याचा मृत्यू झाला, मोंटूच्या हत्या प्रकरणातील साक्षीदार अजय वानखडे याच्यावर आज सायंकाळी बडणेरा इंजीनियरिंग कॉलेज रोडवर चाकूने हल्ला करण्यात आला,यात अजय वानखेडे याचा देखील मृत्यू झाला.मसानगंज परिसरात वैभव पटेरिया या युवकावर शुल्लक वादातून चार ते पाच तरुणांनी हल्ला केला यात वैभव चा मृत्यू झाला.
या तीन हत्येची शाई वाळण्यापूर्वी काल रात्री एका तरुणीने तरुणीचा खून केल्याची घटना घडली. काल रात्री शुभांगी काळे या युवतीची एक्सप्रेस वे वर हत्या केली. माया नगर येथील शीला मेश्राम व आरवी येथील शुभांगी काळे या दोघींचेही एकाच युवकावर प्रेम होते. आपला प्रियकर शुभांगी काळे हिने हीसकावल्याच्या भावनेतून शिलामेश्राम हीणे घरगुती चाकूने शुभांगी काळे हीची हत्या केली.
या प्रकरणी चारही हत्याच्या पोलिसांनी सर्वआरोपींना अटक केली तर मोंटू गोली हत्या प्रकरणातील दोन आरोपी अद्यापही फरार आहेत..शहरात झालेले चारही खून हे सराईत गुन्हेगारांकडून झालेले नसून पोलीस आता रात्रीची पेट्रोलिंग सोबतच गुन्हे गारी पार्श्वभूमीवर च्या युवकांची तपासणी करून कोंम्बिंग ऑपरेशन करणार असल्याचे पोलीस आयुक्त यांनी सांगितले.