महाराष्ट्र

Pandharpur Bypoll Election : पंढरपूर मंगळवेढा पोटनिवडणुकीत दुपारपर्यंत 33.12 टक्के मतदान

Published by : Lokshahi News

बहुचर्चित पंढरपूर-मंगळवेढा विधानसभा पोटनिवडणुकीत आज दुपारी 1 वाजेपर्यत 33.12 टक्के मतदान झाले आहे. आज सकाळी ७ वाजेपासून मतदानाला सुरुवात झाली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर हे मतदान १२ तासांचं असणार आहे.

राष्ट्रवादीचे आमदार भारत भालके यांच्या निधनानं ही जागा रिक्त झाली होती. त्यामुळे लागलेल्या पोटनिवडणूकीत राष्ट्रवादीकडून भगीरथ भालके, भाजपकडून समाधान आवताडे, स्वाभिमानीचे सचिन शिंदे, अपक्ष शैला गोडसे, सिद्धेश्वर आवताडे यांच्यासह 19 उमेदवार रिंगणात आहेत. मात्र थेट लढत ही भाजप राष्ट्रवादीत आहे. त्यामुळे आता कोण बाजी मारणार, याकडे लक्ष लागलं आहे.

राज्यात संचारबंदी लागू असताना पंढरपूर-मंगळवेढा मतदारसंघाला यातून सूट देण्यात आली आहे. निवडणुकीमुळे याठिकाणी मतदान होईपर्यंत संचारबंदी लागू नसेल, असं मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी सांगितलं होतं. सोलापूर जिल्ह्यातील संचारबंदी शिथिल करण्यात आली आहे मात्र जमावबंदीचे आदेश लागू राहणार आहेत.

Aawaj Lokshahicha | सत्ताधारी-विरोधकांच्या भांडणात लातूरचा विकास रखडला; कोण आहे लातूरकरांचा वाली?

Narayan Rane On MVA: मविआ फक्त टाईमपास करतेय ; राणेंचा घणाघात

Bala Nandgaonkar: शिवडीतून बाळा नांदगावकर रिंगणात

Uddhav Thackeray Vaijapur: "लुटेंगे और बाटेंगे" हा भाजपचा नारा, उद्धव ठाकरेंचा मोदी आणि शाहांना टोला

Latest Marathi News Updates live: "तब्येत बरी नाही," काय म्हटले राज ठाकरे?