महाराष्ट्र

भगवान गडावरील दसरा मेळाव्याला औरंगाबादमधून 300 गाड्या रवाना

Published by : Lokshahi News

भाजप नेत्या पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांच्या बीड जिल्ह्यातील सावरगाव येथे १५ ऑक्टोबर रोजी भगवान भक्तिगडावर आयोजित करण्यात आला आहे. या कार्यक्रमासाठी  (Dasra Meleva) औरंगाबाद शहरातून 300 गाड्यांतून समर्थक जाणार आहेत.

भगवान भक्तिगड येथे होणाऱ्या मेळाव्यास पक्षीय मतभेद बाजूला सारून उपस्थित राहण्याचे आवाहन माधवबन ओबीसी भटके-विमुक्त संघर्ष कृती समितीचे अध्यक्ष तथा निमंत्रक प्राचार्य डॉ. खुशाल मुंढे यांनी केले आहे.

दोन वर्षांपासून सर्व कार्यक्रम ऑनलाइन पद्धतीने होत होते. कोरोनाच्या संकटामुळे सार्वजनिक ठिकाणी कार्यक्रमांवर निर्बंध घालण्यात आले होते. या वर्षी मात्र पंकजा मुंडे यांच्या भगवान गडावरच्या दसरा मेळाव्याला प्रशासनाने परवानगी दिली आहे. या दसऱ्या मेळाव्यात पंकजा मुंडे काय बोलणार? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.

महाराष्ट्रातील २८८ मतदारसंघातील पक्षनिहाय विजयी आणि पराभूत उमेदवारांची यादी

Lokshahi Marathi Live Update : महायुतीचे उमेदवार सुरेश भोळे यांना जळगाव जिल्ह्यात विक्रमी मतदान

Railway Platform Yellow Strip: रेल्वे प्लॅटफॉर्मवर असणाऱ्या पिवळ्या पट्टीचा अर्थ काय माहित आहे? जाणून घ्या...

Lokshahi Marathi Live Update : राष्ट्रवादीच्या आमदारांची 'देवगिरी'वर बैठक सुरु

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...