राज्यात कोरोनाचा आलेख खालावताना दिसत आहे. आज ३ हजार ५९५ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत. तर, ४५ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे.
राज्यात ३ हजार २४० रूग्ण बरे झाले आहेत. आजपर्यंत एकूण ६३,२०,३१० कोरोनाबाधित रुग्ण बरे होऊन परतले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.०६ टक्के एवढे झाले आहे.
राज्यात आज रोजी एकूण ४९,३४२ ॲक्टिव्ह रुग्ण आहेत. तर ३ हजार ५९५ नवीन कोरोनाबाधित आढळून आले आहेत.आता राज्यातील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ६५,११,५२५ झाली आहे. तर ४५ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाला आहे. आजपर्यंत १३८३२२ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झालेला आहे. सध्या राज्यातील मृत्यूदर २.१२ टक्के एवढा आहे.