महाराष्ट्र

वर्ध्यात 265 किलो गांजा जप्त; दोन जण पोलिसांच्या ताब्यात

264 किलो गांज्या पकडण्यासाठी सिनेस्टाईल रचला सापळा

Published by : Shweta Shigvan-Kavankar

भूपेश बारंगे | वर्धा : नागपूर अमरावती राष्ट्रीय महामार्गवर रात्रीला अवैधरित्या आसाम येथून अकोला येथे जाणारा अंमली पदार्थ गांजा पोलिसांनी पहाटेला सिनेस्टाईलने ताब्यात घेतला आहे. याप्रकरणी दोन जणांना ताब्यात घेण्यात आले असून 264 किलो गांजा जप्त करण्यात आला आहे.

वर्धा स्थानिक गुन्हे शाखेला मिळालेल्या माहितीवरून कारंजा जवळील बोरगाव (ढोले) फाट्याजवळ सिनेस्टाईल सापळा रचून पांढऱ्या रंगांची मारोती सुझुकी स्वीफ्ट डिझायर कार (क्र. एमएच 31 सी आर 8527) अडवली. कारंजा पोलिसांच्या मदतीने स्थानिक गुन्हे शाखेने कारची पाहणी केली असता मागील सीटमध्ये बॉक्स आढळून आले. यामध्ये कळ्या, बिया, फुले, पान यांचा समावेश असलेली हिरवट रंगांची कॅनॉबिस वनस्पतीची गांजा नावाचे अंमली पदार्थ आढळून आले. यानुसार जवळपास 265 किलो गांजा आढळून आला. यात दोन मोबाईल, कार असा एकूण मुद्देमाल 30 लाख 5 हजाराचा जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी दोन आरोपी ताब्यात घेण्यात आले आहे.

आरोपी कय्युम शहा शहन शहा (वय 34, रा. बोरगाव (मंजू)), शरद बाळू गावंडे (वय 32, रा. अकोला) यांना ताब्यात घेण्यात आले आहे. ही कारवाई पोलीस अधीक्षक प्रशांत होळकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक दारासिंग राजपूत, सहाय्यक पोलीस निरीक्षक महेंद्र इंगळे, उपनिरीक्षक अमोल लगड, पूजा गिरडकर, प्रमोद जांभुळकर, राजेश तिवस्कर, श्रीकांत खडसे, अनिल कांबळे, विकास अवचट, संघासेन कांबळे, संजय बोगा, अवि बनसोड, नितीन मेश्राम, दिनेश बोथकर, अनुप कावळे, लीलाधर उकंडे, चंदू बूरंगे, यशवंत गोहत्रे, निखिल फुटाणे, नितीन वैद्य, उमेश खामनकर, खुशाल चाफले, किशोर कापडे यांनी केली.

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेची आज हॉटेल ताजलँडमध्ये बैठक

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news

आष्टी/बीड: निवडून येताच भाजपाचे नवनिर्वाचित आमदार सुरेश धस यांची पंकजा मुंडेंवर सडकून टीका

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha