राज्यात ओमायक्रॉनचा संसर्ग वाढत चालला आहे. आज २३ ओमायक्रॉनबाधित आढळले असून ओमायक्रॉनबाधितांची एकूण संख्या ८८ झाली आहे. तर दिवसभरात १ हजार १७९ नवीन कोरोनाबाधितांची देखील नोंद झाली आहे.
राज्यातील कोरोना संसर्ग अद्याप पूर्णपणे ओसरलेला नसताना, आता हळूहळू 'ओमायक्रॉन'बाधितांची संख्येतही भर पडताना दिसत आहे. आज राज्यात २३ ओमायक्रॉनबाधित आढळले आहेत.
राज्यात दिवसभरात १ हजार १७९ नवीन कोरोनाबाधितांची देखील नोंद झाली आहे. तर, मागील २४ तासात राज्यात ६१५ रूग्ण कोरोनामुक्त झाले असून, १७ कोरोनाबाधित रूग्णांचा मृत्यू झाल्याची देखील नोंद झाली आहे.आजपर्यंत राज्यात ६५,००,३७५ जण कोरोनामुक्त झाले आहेत. राज्यातील रूग्ण बरे होण्याचे प्रमाण (रिकव्हरी रेट) ९७.७ टक्के आहे. तर, मृत्यू दर २.१२ टक्के आहे.सद्यस्थितीस राज्यात ७६,३७३ जण गृह विलगिकरणात तर ८९९ जण संस्थात्मक विलगिकरणात आहेत.