बारावी परीक्षेचा निकाल बोर्डाच्या वेबसाईटवर जाहीर झाला आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या 12 वीच्या परीक्षेचा निकाल आज जाहीर करण्यात आला. कोकण विभागाचा निकाल सर्वाधिक 97.51 टक्के लागला तर मुंबईचा निकाल सर्वात कमी 91.95 टक्के इतका लागला.
यावर्षीही 12 वीच्या निकालात मुलींनी बाजी मारली. मुलींचा निकाल 95.44 टक्के आहे तर मुलांचा निकाल 91.60 इतका लागला. मुलींच्या निकालाची टक्केवारी मुलांपेक्षा 3.84 टक्क्यांनी जास्त आहे. विशेश बाब म्हणजे 12 वीच्या परीक्षेतील 154 विषयांपैकी 26 विषयांचा निकाल हा चक्क 100 % इतका लागला आहे.
दरम्यान, एकूण 14 लाख 23 हजार 970 विद्यार्थ्यांनी परीक्षा दिली, त्यापैकी 13 लाख 29 हजार 684 विद्यार्थी उत्तीर्ण झाले. 97.51 टक्के असा कोकण विभागाचा सर्वाधिक निकाल लागलाय तर मुंबईचा निकाल सर्वात कमी म्हणजे 91.95 टक्के लागला.