11th Admission :महिन्याभरापासून रखडलेले अकरावीची प्रवेश प्रक्रिया सुरु होणार आहे. कारण ज्या कारणासाठी अकरावीची प्रवेश प्रक्रिया थांबली होती, आता ते पुर्ण झाले आहे. सीबीएसई दहावी बोर्डाचा निकाल आला. यासाठीच अकरावीची प्रवेश प्रक्रिया रखडली होती. आता हे निकाल आज जाहीर झाल्यामुळे ऑनलाइन अकरावी प्रवेश प्रक्रियेचा मार्ग मोकळा झाला आहे.
राज्य मंडळाच्या दहावीचा निकाल 17 जून रोजी जाहीर होऊन एक महिना झाला तरी देखील अकरावी प्रवेशाची प्रवेश प्रक्रिया रखडली होती. सीबीएसई बोर्डाचा दहावीचा निकाल जाहीर झाल्यानंतर अकरावी प्रवेशाची प्रक्रिया सुरू होणार आहे. अकरावी प्रवेश प्रक्रियेच्या प्रवेश फेऱ्यांचे वेळापत्रक सोमवारपर्यंत जारी केले जाणार आहे.
ऑनलाइन अकरावी प्रवेशाच्या अर्ज भरण्यातील महत्त्वाचा टप्पा असलेली अर्ज भाग -२ भरण्याची प्रक्रिया शिक्षण संचालनालयामार्फत आज २२ जुलैपासून सुरू करण्यात आली आहे. यामध्ये पसंतीची दहा महाविद्यालये प्राधान्यक्रमाने नोंदवता येत आहेत. विद्यार्थ्यांना अर्जाचा भाग 2 भरल्यानंतर तो लॉक करावा लागणार आहे. तसेच ज्या विद्यार्थ्यांना अकरावी प्रवेशासाठी नोंदणी अर्ज भरला नाही त्यांना भाग एक आणि भाग दोन भरता येणार आहे. तसेच सीबीएसई बोर्डाचा विद्यार्थ्यांचा निकाल आल्यामुळे त्यांचा अर्जाचा भाग एक आणि दोन भरण्यास सुरुवात झाली आहे. कोटा प्रवेशासाठी अर्ज करण्याची प्रक्रियाही सुरू करण्यात आली आहे. अर्जातील चुका दुरुस्त करण्यासोबत कागदपत्रांची पडताळणीही होणार आहे, असे माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण संचालक महेश पालकर यांनी काढलेल्या परिपत्रकात स्पष्ट करण्यात आले आहे.
कुठे ऑनलाईन प्रवेश
मुंबई महानगर क्षेत्र (एमएमआर), पुणे, पिंपरी-चिंचवड, नाशिक, अमरावती, नागपूर महानगरपालिका क्षेत्रांतील ऑनलाईन पद्धतीने प्रवेश होणार आहे.