कोरोनाची वाढती रुग्णसंख्या लक्षात घेता राज्यात पुन्हा शालेय शिक्षण ऑनलाइन झाले आहे. या पार्श्वभूमीवर दहावी व बारावीच्या परीक्षा ऑनलाइन होणार का, अशी शंका उपस्थित होत असतानाच या परीक्षा ऑफलाइनच होणार असून, त्या वेळापत्रकानुसार घेण्याचे नियोजन सुरू आहे.
दरम्यान दहावी आणि बारावीच्या परीक्षा ऑफलाइनच होणार आहे. याह विद्यार्थ्यांनी अफवांवर विश्वास न ठेवता तयारीला लागावे अस आवाहन बोर्डाकडून करण्यात आले आहे. कोरोना संकट असले तरी बोर्डाच्या यंदाच्या परीक्षा ऑफलाइन होतील. पुढील15 दिवसात कोरोना परिस्थिती पाहून पुढील निर्णय होईल, मात्र विद्यार्थ्यांनी अभ्यासाला लागावं अस बोर्डाकडून सांगण्यात आले आहे. यंदा दहावीचे 16 लाख 19 हजार तर बारावीचे14 लाख 65 हजार विद्यार्थी परीक्षा देणार आहेत.