लोकशाही न्यूज नेटवर्क
कोरोना काळामुळे गेले अनेक महिने शाळा व महाविद्यालये ऑनलाइन पद्धतीने सुरु आहेत. पण आता महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक मंडळाने इयत्ता दहावी-बारावीच्या परीक्षांच्या तारखा जाहीर केल्या आहेत.
१० वीच्या परीक्षा २९ एप्रिल ते ३१ मे या काळात होणार असून, दहावीचा निकाल ऑगस्ट महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात लागेल. तर बारावीची लेखी परीक्षा २३ एप्रिल ते २९ मे या काळामध्ये होणार आहे, जुलै च्या शेवटच्या आठवड्यात निकाल लागेल, अशी माहिती राज्याच्या शिक्षण मंत्री वर्षा गायकवाड यांनी दिली. या दोन्ही परीक्षांसाठी २५ टक्के अभ्यासक्रम देखील कमी करण्यात आला आहे .
या दोन्ही परीक्षा ऑफलाइन पद्धतीने होणार आहेत. पण कोरोना विषाणूच्या पार्श्वभूमीवर परीक्षा केंद्रांवर सूचनांचे काटेकोरपणे पालन केले जाईल. या काळामध्ये एखादा विद्यार्थी कोरोनाबाधित असेल तर त्या विद्यार्थांची फेरपरीक्षा घेतली जाईल, अशी माहितीदेखील वर्षा गायकवाड यांनी यावेळी दिली.