राज्यात कोकण आणि पश्चिम महाराष्ट्रात आलेल्या पुरामुळे बाधितांचे मोठे नुकसान झाले आहे. या पूरग्रस्तांचे जनजीवन पूर्ववत व्हायला अदयाप खूप वेळ लागणार आहे. तसेच पंचनामे पूर्ण होण्यास अधिकच कालावधी लागणार असल्याने सरकारने तातडीच्या मदतीची नुकतीच घोषणा केली होती. हि तातडीची १० हजाराची रक्कम आता उद्या शुक्रवारपासून पूरग्रस्तांच्या खात्यात जमा होणार असल्याचं मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. डेट्टीवार यांनी माध्यमांशी बोलताना ही माहिती दिली आहे.
पूरग्रस्त भागातील बहुतांश ठिकाणी अद्याप पाणी ओसरले नसल्याने व बाधितांचे पंचनामे सुरु आहेत. उद्या शुक्रवारपासून १० हजाराची रक्कम पूरग्रस्तांच्या खात्यावर जमा होणार असल्याचं मदत आणि पूनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी सांगितलं आहे. "पूरग्रस्तांना तातडीने मदत जाहीर केली आहे. हे दहा हजार रुपये त्यांच्या खात्यात जमा करण्यात येणार आहेत. रोख रकमेचं वाटप केलं तर अनेक आरोप होतात. पैशाचं वाटप बरोबर झालं नाही, गैरप्रकार झाले, असे आरोप होतात. त्या भानगडीत आम्हाला पडायचं नाही. त्यामुळे उद्यापासूनच आम्ही त्यांना हे पैसे देणार आहोत. तशी व्यवस्था करणार आहे," असं वडेट्टीवार यांनी म्हटले.