भूपेश भारंगे | वर्धा जिल्ह्यातील हिंगणघाट तालुक्यात भाजपला मोठा धक्का बसला आहे.हिंगणघाट नगर पालिकेचे १० विद्यमान आणि २ माजी नगरसेवक अशा १२ जणांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मुंबईत शिवबंधन बांधून शिवसेनेत जाहीर प्रवेश घेतला.
मातोश्री निवासस्थानी झालेल्या या प्रवेश कार्यक्रमाला शिवसेना नेते उपस्थित होते. वर्ध्याचे संपर्क प्रमुख अनंत गुडे , जिल्हा प्रमुख बाळा शहागडकर उपस्थित होते.
भाजपच्या नगरसेवकांनी शिवसेनेत प्रवेश केल्यामुळे येणाऱ्या नगरपालिकेच्या निवडणुकीत हिंगणघाट नगरपालिकेचे गणिते बदलतील.सध्या हिंगणघाट नगरपालिकामध्ये 38 सदस्य असून यात भाजप 28, शिवसेना 4, राष्ट्रवादी 1, अपक्ष 3 असे आहे. तर यातून 28 भाजप नगरसेवक मधून 10 विद्यमान नगरसेवक यांनी आज शिवसेनेत प्रवेश घेतला आहे.
नगरसेवक व माजी नगराध्यक्ष सुरेशभाई मुंजेवार, नगरसेवक मनीष देवडे, नगरपालिकेचे उपाध्यक्ष चंद्रकांत घुसे, नगरसेवक सतीश धोबे, नगरसेविका नीता धोबे,स्वीकृत नगरसेवक मनोज वरघणे, नगरसेविका सुनीता पचोरी, नगरसेवक निलेश पोगले, नगरसेविका संगीता वाघमारे, नगरसेवक भास्कर ठवरी,माजी नगरसेवक देवा पडोळे या अकरा जणांनी मुंबई येथे जाऊन मातोश्रीवर प्रवेश केला आहे.