राज्यात कोरोनाची दुसरी लाट ओसरत चालली आहे. त्यामुळेच नव्या कोरोनाबाधितांपेक्षा कोरोनामुक्त होणाऱ्या रुग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. आरोग्य विभागासह, राज्य सरकारसाठी ही दिलासादायक बातमी आहे.
आरोग्य विभागाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या २४ तासांत राज्यात एकूण ३ हजार ६४३ नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. सध्या राज्यातील उपचाराधीन रुग्णांची संख्या एकूण ४९ हजार ९२४ इतकी आहे. तर ६ हजार ७९५ रुग्ण कोरोनामुक्त झाले असून, आतापर्यंत एकूण ६२ लाख ३८ हजार ७९४ रुग्ण बरे झाले आहेत. यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण म्हणजेच रिकव्हरी रेट ९७.०५ टक्क्यांवर गेला आहे. तर, याच कालावधीत १०५ रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. आताच्या घडीला राज्यातील मृत्यूदर २.११ टक्के इतका आहे.
मुंबईत २२६ नवीन रुग्ण
मुंबईत गेल्या २४ तासांत केवळ २२६ नवीन कोरोनाबाधितांची भर पडली आहे. तर याच कालावधीत २९७ रुग्ण कोरोनावर मात करून घरी परतले आहेत. दिवसभरात मुंबईत ४ रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांचा एकूण आकडा १५ हजार ९५१ इतका झाला आहे. मुंबईत कोरोनाचे २ हजार ८०१ उपचाराधीन रुग्ण आहेत. मुंबईतील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण ९७ टक्के असून, रुग्णवाढीचा दर ०.०४ टक्के इतका आहे. रुग्णदुपटीचा कालावधी १९८३ दिवसांवर गेला आहे.