राज्यातील कोरोना स्थिती हळूहळू आटोक्यात येत असतानाच कोरोनाच्या तिसऱ्या लाटेचा धोका वर्तवण्यात येत आहे. त्यामुळे नागरिकांचे लसीकरण पूर्ण लवकरात लवकर पूर्ण करण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं दिसून येत आहे.
महाराष्ट्राने कोरोना प्रतिबंधात्मक लसीकरण मोहिमेमध्ये लक्षणीय कामगिरी केली असून राज्यात आतापर्यंत तब्बल दीड कोटी नागरिकांना लसीचे दोन्ही डोस देऊन झाले आहेत. राज्यात १ कोटी ५३ लाख ७८ हजार ४५० नागरिकांनी लसीचे दोन्ही डोस पूर्ण केले आहेत. या कामगिरीबद्दल मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी राज्याच्या आरोग्य यंत्रणेचं कौतुक केलं आहे.
विशेष म्हणजे, देशातील अन्य राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात दोन्ही डोस पूर्ण झालेल्या नागरिकांची संख्या सर्वाधिक आहे, तर शुक्रवारी राज्यात एका दिवसात सुमारे १० लाख नागरिकांचं लसीकरण करत विक्रमी नोंद करण्यात आली आहे.