राज्यातील महाविद्यालयं 1 फेब्रुवारी पासून सुरू होणार अशी माहिती उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी दिली आहे. कोरोनाच्या नियमाचे पालन करून महाविद्यालय सुरू होणार असल्याचे नवे आदेश काढण्यात आले आहेत.
कोरोनाच्या संसर्गामुळे शाळा, कॉलेज बंद आहेत. त्यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. नुकताच कोरोनाचा संसर्ग कमी असणाऱ्या जिल्हयात शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यानुसारच शाळांबाबत निर्णय झाल्यानंतर कॉलेजही सुरू करण्यााबाबत राज्य सरकारकडून हालचाली सुरू केल्या होत्या. विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळण्याबाबत शासन सकारात्मक होते, त्याच अनुशंगाने हा निर्णय आज घेण्यात आला आहे. मुख्यमंंत्र्यांनी राज्यातली महाविद्यालये सुरू करण्यास आता हिरवा कंदील दाखवल्याने कॉलेज कॅम्पस पुन्हा बहरणार आहेत. उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी तसा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांपुढे ठेवला होता, अखेर त्या प्रस्तावाला मुख्यमंत्र्यांनी मंजुरी दिल्याने कॉलेज सुरू होण्याचा मार्ग आता मोकळा झाला आहे.