Covid-19 updates

Maharashtra Corona | राज्यात 9 हजार 677 नवे बाधित; मृतांच्या संख्येत घट

Published by : Lokshahi News

राज्यात कोरोना रुग्णांसह डेल्टा प्लस Delta Plus ची रुग्णसंख्या वाढत चालली आहे. त्यामुळे सर्वच जिल्ह्यांना तिसऱ्या टप्प्यांवरचे निर्बंध लागू करण्याचे आदेश दिले आहेत. तर रुग्णसंख्येत वाढ सुरु आहे. राज्यात राज्यात 9 हजार 677 नवे बाधित आढळून आले असून मृतांची संख्या 156 वर पोहोचली आहे.

आरोग्य विभागाने दिलेल्या आकडेवारीनुसार, राज्यात 1 लाख 20 हजार 715 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. तर 9 हजार 677 नवे कोरोनाबाधित आढळले, त्यामुळे आतापर्यंत एकूण 60 लाख 17 हजार 35 झाला आहे. 10 हजार 138 रुग्णांनी कोरोनावर मात केली. त्यामुळे आजपर्यंत 57 लाख 72 हजार 799 इतका झाला आहे. या पार्श्वभूमीवर राज्याचा रिकव्हरी रेट 95.94टक्के इतके झाले आहे.

गुरुवारी 194 असणारा मृतांचा आकडा शुक्रवारी मात्र खाली येत 156 वर आला आहे. त्यामुळे राज्यातील मृतांच्या नोंदीमध्ये मोठ्या प्रमाणावर घट झाली आहे. आजपर्यंत 1 लाख 20 हजार 370 रुग्णांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती