नव्या महिन्याच्या सुरुवातीलाच सर्वसामान्यांना महागाईचा झटका बसला आहे. एलपीजी सिलेंडर आणखी महाग झाला आहे. आज एक सप्टेंबरपासून विनाअनुदानित घरगुती एलपीजी सिलेंडरची किंमत 25 रुपयांनी वाढली आहे. ताज्या दरवाढीनंतर, १४.२ किलोच्या घरगुती सिलेंडरची किंमत आता दिल्लीमध्ये ८८४.५० प्रतिलीटर असेल. १९ किलोच्या व्यावसायिक सिलेंडरच्या किंमतीतही प्रति सिलेंडर 75 रुपयांनी वाढ झाली आहे.
एक जानेवारीपासून आतापर्यंत आठ महिन्यांमध्ये सिलेंडच्या किमतींमध्ये 190 रुपयांची वाढ झाली आहे. एक जानेवारी रोजी दिल्लीत घरगुती गॅस सिलेंडरची किंमत 694 रुपये होती. आता दर वाढून 884.5 रुपयांवर पोहोचले आहेत. 2021 मध्ये फेब्रुवारी महिन्यात सिलेंडरचे दर वाढून 719 रुपये इतकी झाली आहे. त्यानंतर सिलेंडच्या किमती 15 फेब्रुवारी रोजी 769 रुपये, 25 फेब्रुवारी रोजी 794 रुपये, 1 मार्च रोजी 819 रुपये, 1 एप्रिल रोजी 809 रुपये, 1 जुलै रोजी 834.5 रुपये, 18 ऑगस्ट रोजी 859.5 रुपये इतक्या होत्या.
मुंबईत घरगुती एलपीजी सिलेंडरचा दर आता ८८४.५ रुपये आहे, पूर्वी तो ८५९.५० रुपयांमध्ये विकला जात होता. चेन्नईमध्ये स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरसाठी तुम्हाला आजपासून ९००.५० रुपये भरावे लागतील, कालपर्यंत ७५५.५० रुपये भरावे लागत होते. उत्तर प्रदेशच्या लखनऊमध्ये एलपीजी सिलेंडरसाठी तुम्हाला ८९७.५ रुपये भरावे लागतील.
आजपासून काय बदलणार?
UAN आधार कार्डशी लिंक नसेल तर कर्मचाऱ्याच्या खात्यात पीएफ जमा होणार नाही
पॉझिटिव्ह पे सिस्टम लागू केल्यास 50 हजार रुपयांपेक्षा जास्तीच्या रकमेचं चेक पेमेंट करण्यात अडचणी येणार
पंजाब नॅशनल बँकेच्या बचत खात्यावरील व्याजदरात 0.10 टक्यांची कपात
गॅसचे दर प्रत्येक महिन्याच्या 1 तारखेला ठरणार
वाहन खरेदीवेळी 5 वर्षांसाठीचं विमा कवच घेणं बंधनकारक
'डिस्नी प्लस हॉटस्टार'चं सबस्क्रिप्शन 100 रुपयांनी महागणार
अॅमेझॉनवरुन सामान मागवणं महागणार. डिलिव्हरी चार्ज वाढणार
बनावट माहिती देणाऱ्या अॅप्सवर गूगल प्ले स्टोअर बंदी घालणार