इच्छापूर्तीसाठी महाशिवरात्रीला (mahashivratri) भगवान शंकर देवाची पूजा केली पाहिजे. या दिवशी पूजा करुन शंकर भगवानाला (lord shiva) कडे केलेली मनोकामना पुर्ण होते. जाणून घ्या शास्त्रोपद्धतीने पूजा कशी करावी.
शास्त्रानुसार ज्या व्यक्तीला शंकर भगवानच्या चरणात लीन होण्याची इच्छा आहे किंवा संसाराच्या मोह मायेपासून मुक्त होऊ इच्छिते त्या व्यक्तीने महाशिवरात्रीच्या दिवशी दुधाने (milk)आणि गंगाजलने (ganga)शंकर भगवानचा अभिषेक करावा. सोबतच जागरण करत शिव पुराणाचा पाठ करावा. शिव भजनाने पण लाभ होतो, अशी धार्मिक मान्यता आहे.
आर्थिक समस्येपोसून सुटका
आर्थिक समस्येमुळे जी व्यक्ती नेहमी चिंतेत असतात. त्यांच्यांसाठी शास्त्रामध्ये महाशिवरात्रीच्या पूजेचे महत्व दिले आहे. ज्या व्यक्तीला आर्थिक समस्या आहेत, अशा व्यक्तींनी महाशीवरात्रीच्या दिवशी शंकर भगवानची दहीने अभिषेक करावा. सोबतच साजुक तुप आणि मधाने शंकर भगवानचा अभिषेक करावा. प्रसाद म्हणून ऊस अर्पण करावा. सकाळी सूर्योदयापासून १ तासाच्या आत पंचामृताने (दूध, दही, मध, साखर, तूप) भगवान शिवाला अभिषेक करा.
सनतान सुख
ज्या दांपत्याना सनतानाची आपेक्षा बागळतात त्यांनी महाशीवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर दुधात केसर टाकून अभिषेक करावा. शंकर भगवाना सोबतच देवी पार्वती, भगवान गणेश आणि कार्तिक स्वामींची पूजा करावी. या देवांची पूज्या केल्याने संतती सुखाचे योग मजबूत होते.
सुखी व्यवाहीक जीवन
सुखी व्यवाहीक जीवनासाठी 'ॐ पार्वतीपतये नमः मंत्राचा जाप करावा. या मंत्रामुळे शंकर भगवानसह माता पार्वतीचा आर्शीवाद लाभतो. शिवरात्रीच्या दिवशी पती-पत्नी मिळून शिवलिंगाला गायीचे शुद्ध तूप अर्पण करावे.
सुदृढ आरोग्यासाठी
सुदृढ आरोग्यासाठी जल आणि दुर्वा शंकर भगवानाला अर्पण करावा. मातीच्या दिव्यात गाईचे तूप भरून कापूर जाळून टाकावे. त्यानंतर भगवान शंकराला तांदूळ, दूध आणि साखरेची मिठाई अर्पण करा. सोबत महामृत्युंजय मंत्राचा (mahamrityunjaya mantra) जप देखील करावा.