लोकशाही स्पेशल

World Toilet Day 2023: का साजरा केला जातो जागतिक शौचालय दिवस, जाणून घ्या इतिहास, महत्त्व आणि स्वच्छतेशी संबंधित महत्त्वाचे नियम

Published by : shweta walge

World Toilet Day 2023; मोठ्या शहरांमध्ये राहणारे लोक स्थायी टॉयलेटशिवाय जीवनाची कल्पनाही करू शकत नाहीत. पण एक सत्य हे देखील आहे की आजही जगातील ३.६ अब्ज लोकांकडे शौचालये नाहीत. जागतिक शौचालय दिन दरवर्षी १९ नोव्हेंबर रोजी जगभरात साजरा केला जातो. हा विशेष दिवस प्रत्येक व्यक्तीच्या जीवनात शौचालय आणि स्वच्छतेच्या महत्त्वाबद्दल जागरूकता आणण्यासाठी साजरा केला जातो. जागतिक शौचालय दिन साजरा करण्यामागील उद्देश म्हणजे महिलांच्या आरोग्य आणि सुरक्षिततेला प्रोत्साहन देणाऱ्या आदर्श स्वच्छताविषयक पद्धतींबद्दल लोकांमध्ये जागरूकता निर्माण करणे आणि जनजागृती करणे हा आहे. हा दिवस साजरा करण्यामागचे मुख्य कारण म्हणजे लोकांना उघड्यावर शौचास जाण्यापासून रोखणे, जे आरोग्यासाठी धोकादायक ठरू शकते.

जागतिक शौचालय दिनाचा इतिहास

जागतिक शौचालय दिनाची सुरुवात 19 नोव्हेंबर 2001 रोजी सिंगापूरच्या जॅक सिम यांनी केली. 2001 मध्ये जॅक यांनी WTO म्हणजेच वर्ल्ड टॉयलेट ऑर्गनायझेशनची स्थापना केली होती. तर, 2013 मध्ये संयुक्त राष्ट्र संघटनेने अधिकृतपणे संयुक्त राष्ट्र जागतिक शौचालय दिनाची घोषणा केली.

का साजरा केला जातो जागतिक शौचालय दिवस?

उघड्यावर शौचास जाण्याने जंतुसंसर्ग व इतर आजारांचा धोका असतो. याविषयी आज जनजागृती केली जाते.

जगभरातील स्वच्छता, आरोग्य आणि सुरक्षा धोरण मजबूत करण्यासाठीही हा दिवस आवश्यक आहे.

उघड्यावर शौचास बसल्याने महिला व किशोरवयीन मुलींना अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. यामुळे शौचालयाचे महत्त्व आज पटवून दिले जाते.

जाणून घ्या स्वच्छतेशी संबंधित महत्त्वाचे नियम

टॉयलेटमध्ये फोन वापरू नका

बर्‍याच लोकांना हे माहीत नाही की टॉयलेटमध्ये फोन वापरल्याने त्यांना संसर्ग होऊ शकतो आणि आरोग्याशी संबंधित अनेक समस्याही होऊ शकतात. वास्तविक, बाथरूममधील बहुतेक जंतू कमोड, फ्लश, टॅप, हँड ड्रायर, डोअर लॅचवर वाढतात. जेव्हा तुम्ही फ्रेश असताना फोन सोबत घेऊन जाता, तेव्हा तुमचा फोन विष्ठामधील बॅक्टेरियाच्या संपर्कात येतो आणि यामुळे तुम्ही आजारी पाडता.

कमोडच्या आजूबाजूला सामान ठेवू नका

तुमचे टॉयलेट आणि बाथरूम एकाच ठिकाणी असेल तर, कमोडजवळ काहीही ठेवू नका. यामुळे संसर्गाचा धोका मोठ्या प्रमाणात वाढतो.

टॉयलेटचे झाकण उघडे ठेवू नका

जर तुम्ही झाकण उघडे ठेवून टॉयलेट फ्लश करत असाल तर ही सवय लगेच बदला. असे केल्याने हवेतील जीवाणू आणि विषाणू टॉयलेट कमोडमध्ये येऊ शकतात. त्यामुळे पुढच्या वेळी त्या टॉयलेट सीटचा वापर करणाऱ्या व्यक्तीला अनेक आजार होऊ शकतात.

पब्लिक टॉयलेटचा वापर कमी करा

घराबाहेर प्रवास करताना, वेस्टर्न टॉयलेटऐवजी भारतीय टॉयलेट वापरण्याचा प्रयत्न करा. याशिवाय, शौचालयाचा बाहेर वापर केल्यानंतर, आपले अंतरंग क्षेत्र आणि हात पूर्णपणे स्वच्छ करा.

पाणीपुरवठा पूर्ववत झाल्यानंतर पाणी गाळून आणि उकळून पिण्याचे महानगरपालिका प्रशासनाचे आवाहन

पर्यावरण रक्षण आणि हरित महाराष्ट्रासाठी वर्ल्ड ॲग्रीकल्चर फोरमच्या 20 देशातील प्रतिनिधींच्या उपस्थितीत सन्मान सोहळा जाहीर

Aditi Rao Hydari Wedding Look: नववधू अदिती राव हैदरी सजली नवराईच्या पेहरावात, पाहा "हे" सुरेख फोटो...

Narendra Patil On Jarange Patil | नरेंद्र पाटलांचा मनोज जरांगे राजेश टोपेंवर हल्लाबोल | Marathi News

Sanjay Gaikwad On Rahul Gandhi | गायकवाडांकडून राहुल गांधींची जीभ छाटण्याची भाषा | Marathi News