लोकशाही स्पेशल

World Population Day 2024 : जागतिक लोकसंख्या दिन 2024; जाणून घ्या हा दिन साजरा करण्याचे महत्त्व

Published by : Dhanshree Shintre

11 जुलै हा दिवस जगभरात जागतिक लोकसंख्या दिन म्हणून साजरा केला जातो. 11 जुलै, 1987 रोजी जागतिक लोकसंख्या सुमारे 5 अब्ज झाली होती. त्यामुळे लोकसंख्येची वाढ हा सार्वजनिक स्तरावरील सर्वाधिक स्वारस्यपूर्ण विषय बनला होता. लोकसंख्येत दिवसेंदिवस वाढ झाल्यामुळे लोकसंख्यावाढीच्या संदर्भात अनेक कार्यक्रम राबविण्यात येऊ लागले.1989 मध्ये ‘संयुक्त राष्ट्रसंघाच्या विकासविषयक कार्यक्रमा’च्या (UNDP) गव्हर्निंग कौन्सिलने 11 जुलै हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून जगभर साजरा केला जावा, अशी शिफारस केली. या शिफारशीनुसार, 1989 पासून 11 जुलै हा दिवस ‘जागतिक लोकसंख्या दिन’ म्हणून साजरा केला जातो.

या दिवसाचे औचित्य साधून जगभरात विविध कार्यक्रमांचे आयोजित केले जाते. लोकसंख्यावाढीमुळे जाणवणार्‍या समस्यांकडे लोकांचे लक्ष वेधणे, त्याविषयी जनजागृती करणे आणि या समस्येशी लढा देणे यासाठी हा दिवस साजरा केला जातो. 2019 पर्यंत जगात 770 कोटी इतकी लोकसंख्या होती. त्यात आता आणखी वाढ झालेली आहे. दर 10 वर्षांनी जनगणना केली जाते.

लोकसंख्या दिन घोषवाक्ये:

कुटुंब असेल लहान, मेरा भारत महान

करूया लोकसंख्येचे नियंत्रण, अन्यथा ठरेल अधोगतीस निमंत्रण

कुटुंब लहान, सुख महान

आजचे प्रयोजन, कुटुंब नियोजन

कुटुंब नियोजनात कसूर, लोकसंख्येचा प्रश्न भेसूर

करूया कुटुंबाचे नियोजन, आनंदी राहू प्रत्येकजण

Bacchu Kadu : 4 नोव्हेंबरला पूर्ण चित्र स्पष्ट होईल, मोठा स्फोट होईल; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य

ललित पाटील ड्रग्ज प्रकरण; आठ आरोपींना जामीन मंजूर

विधानसभा निवडणुकीत विश्व हिंदू परिषद मैदानात

शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात मोठी इनकमिंग होणार

Salman Khan : बॉलीवूड अभिनेता सलमान खानला पुन्हा धमकी