लोकशाही स्पेशल

World Oceans Day | आज जागतिक महासागर दिन

Published by : Lokshahi News

आज 8 जून आणि हा दिवस जागतिक महासागर दिन म्हणून साजरा केला जातो. संपूर्ण जगभरात हा दिवस साजरा केला जातो. समुद्र दुषित होण्याचे प्रमाण वाढल्याने त्यासंबंधी जनजागृती करणे आवश्यक बनले आहे. या संदर्भातला प्रस्ताव १९९२ मध्येच कॅनडाने ब्राझीलमध्ये झालेल्या वसुंधरा शिकार परिषदेत मांडला. त्याला संयुक्त राष्ट्रसंघाने २००८ मध्ये मान्यता दिली. तेव्हापासून 'द ओशन प्रोजेक्ट' या अमेरिकन संस्थेच्या सहकार्याने, जागतिक महासागर दिवस आंतरराष्ट्रीय पातळीवर साजरा होत आहे आहे.

दिन साजरा करण्याचा मुळ हेतू
जगभरातील महासागरांच्याविषयी कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी हा दिवस वर्षातून एकदा साजरा केला जातो. महासागर हे संरक्षिले जावेत आणि नैसर्गिकदृष्ट्या असलेले त्यांचे महत्व जपले जावे असा हा दिवस साजरा करण्याता मुख्य हेतू आहे. प्राणवायू, वातावरणाचे नियमन, अन्नाचा पुरवठा, औषधे आणि अन्य बाबींसाठी महासागरांचे स्थान महत्वाचे आहे. २०१८ मध्ये प्लॅस्टिकपासून महागराचे रक्षण हे ध्येय ठेवण्यात आले होते.

महासागर हे आपल्याला लाभलेली नैसर्गिक संपत्ती आहे. त्याचे संरक्षण केले नाही तर महासागरातील जलचरांना धोका निर्माण होऊ शकतो, आणि त्याचे विपरित परिणामाला आपल्यालाही समोरे जावे लागेल त्यामुळे आज जागतिक महासागर दिना निमित्त महासागरचे संरक्षणाचे कार्य हाती घ्या.

आपल्या महासागरांमध्ये 80 टक्क्यांहून जास्त जैवविविधता जोपासली जाते. 3 बिलियन नागरिक मत्याहारावर अवलंबून आहेत. 10 पैकी 1 व्यक्ती उदरनिर्वाहासाठी मत्स्यव्यवसायावर अवलंबून आहे. महासागर नसेल तर जीवसृष्टीच धोक्यात येईल या महत्त्वाच्या मुद्द्याकडे सर्वांचचं यानिमित्तानं लक्ष वेधण्यात आलं आहे. महासागरांप्रती आभारभावना व्यक्त करणं हा या दिवसामागचा मुख्य हेतू आहे. अन्नसाखळीपासून ते अन्नसाठा पुरवठ्यापर्यंत आणि प्राणवायुपासून वातावरणापर्यंत प्रत्येक गोष्टी हे महासागर अतीव महत्त्वाची भूमिका बजावतात. त्यामुळं त्यांचं संवर्धन करणं अत्यंत गरजेचं आहे हेच या दिवसाच्या निमित्तानं शक्य त्या परींनी सर्वांपर्यंत पोहोचवण्यात येतं.

अमित ठाकरे यांच्या प्रचाराला आजपासून होणार सुरुवात

मुंबईत पुढील दोन दिवस उष्णतेचे

मुंबईत पुढील दोन दिवस उष्णतेचे

माहीमधून विधानसभा लढण्यावर सदा सरवणकर ठाम; म्हणाले...

Air Quality Index: फटाक्यांच्या आतषबाजीनं मुंबईची हवा खालावली; 'या' परिसरात ‘वाईट’ हवेची नोंद