लोकशाही स्पेशल

जागतिक पर्यावरण दिन का साजरा केला जातो? 2023ची थीम काय? जाणून घ्या

जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जगभरात पर्यावरण वाचवण्यासाठी जनजागृती मोहिम राबवली जाते. म्हणूनच दरवर्षी 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

पृथ्वी ही आपली आई आहे आणि निसर्ग हे आपले जीवन आहे. निसर्गाशिवाय मानवी जीवन शक्य नाही, परंतु तरीही आपण विकासाच्या आणि आधुनिकतेच्या शर्यतीत पर्यावरणाची हानी करत आहोत. आपण निसर्गापासून दूर जात आहोत. आपल्याला वेळोवेळी पर्यावरणाची हानी होण्याचाही फटका बसत आहे. कधी पूर येतो तर कधी ढग फुटतात. कुठेतरी पृथ्वीवर पाण्याचा दुष्काळ पडत आहे तर कुठे जमीन आग ओकत आहे. हे सर्व केवळ हवामान बदलामुळे घडत आहे.

झाडे तोडल्यामुळे हवा इतकी प्रदूषित झाली आहे की शहरांमध्ये श्वास घेणेही कठीण झाले आहे. शहरांचे जीवन पर्यावरण आणि निसर्गापासून कोसो दूर झाले आहे, येथे राहणाऱ्या लोकांना असे आजार होत आहेत जे याआधी लोकांनी कधी ऐकले नाहीत किंवा पाहिलेही नाहीत. या सगळ्याचे कारण कुठेतरी आपली ढासळलेली जीवनशैली आहे. जागतिक पर्यावरण दिनानिमित्त जगभरात पर्यावरण वाचवण्यासाठी जनजागृती मोहिम राबवली जाते. म्हणूनच दरवर्षी 5 जून रोजी जागतिक पर्यावरण दिन साजरा केला जातो.

जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याचा उद्देश

विकासाबरोबरच जगभरात पर्यावरणाचीही हानी होत आहे. जंगले नष्ट होत आहेत. नद्या-नाल्यांचे प्रवाह बदलले जात आहेत. त्यामुळे जगभरात प्रदूषणाची पातळी वाढत आहे. वाढते प्रदूषण आणि निसर्गाचे होणारे नुकसान कमी करण्यासाठी जनजागृती मोहिम राबवण्यासाठी पर्यावरण दिन साजरा केला जातो. या दिवशी लोकांना पर्यावरणाबाबत जागरूक केले जाते. निसर्गाला प्रदूषित होण्यापासून वाचवा, असे आवाहन नागरिकांना केले जात आहे.

जागतिक पर्यावरण दिनाची थीम

प्लॅस्टिकचा वापर पर्यावरणासाठी अत्यंत हानिकारक आहे याची जाणीव सर्वांना असून त्याचा वापर थांबविण्यावर आपण भर दिला पाहिजे. अशा परिस्थितीत यंदाची थीमही यावर आधारित असून, ‘बीट प्लास्टिक पॉल्यूशन’ असे नाव देण्यात आले आहे.

जागतिक पर्यावरण दिनाचा इतिहास

पर्यावरणाची होणारी हानी लक्षात घेऊन पहिल्यांदा 1972 साली संयुक्त राष्ट्र संघाने पर्यावरण दिन साजरा करण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून 5 जून हा पर्यावरण दिन जगभरात साजरा केला जातो. संयुक्त राष्ट्र संघाने जरी जागतिक पर्यावरण दिन साजरा करण्याची घोषणा केली असली, तरी पहिल्यांदाच स्वीडनची राजधानी स्टॉकहोम येथे 5 जून 1972 रोजी पर्यावरण परिषद झाली होती.

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती