लोकशाही स्पेशल

World Cancer Day 2022 : जागतिक कर्करोग दिन का साजरा केला जातो?

Published by : Lokshahi News

जगभरातील लोक दरवर्षी आजच्या दिवशी म्हणजेच 4 फेब्रुवारीला जागतिक कर्करोग दिन (World Cancer Day) साजरा करतात. कर्करोग हा प्राणघातक आजार असल्याचे आपण सर्वजण जाणतो. त्यामुळे कॅन्सरच्या नावाने लोकांमध्ये एक वेगळीच भीती दिसून येते. युनियन ऑफ इंटरनॅशनल कॅन्सर कंट्रोलने (UICC) देखील हा दिवस जागतिक एकत्रीकरण उपक्रम (global uniting initiative) म्हणून घोषित केला आहे.

हा दिवस 1933 मध्ये साजरा करण्यास सुरुवात झाली. त्यामागचा उद्देश हा आहे की लोकांना या आजाराविषयी माहिती मिळावी आणि त्यापासून बचाव करण्याच्या उपायांची माहितीही दिली जावी. या दिवशी UICC ने काही इतर कर्करोग सोसायट्या, उपचार केंद्रे आणि संशोधन संस्थांच्या मदतीने याचे आयोजन केले होते.

जागतिक कर्करोग दिनाचे उद्दिष्ट:

जागतिक कर्करोग दिन साजरा करण्यामागचा उद्देश समाजात कर्करोगाविषयी जागरूकता वाढवणे आणि या आजाराबाबत लोकांमध्ये असलेला संभ्रम दूर करणे हा आहे. जेव्हा लोक जागरूक होतील, तेव्हा रोग आणि मृत्यूचे प्रमाण कमी करणे खूप सोपे होईल.

2020 मध्ये 18.1 लाख कॅन्सरची प्रकरण समोर आली होते. यातील 9.3 लाख पुरुषांना तर 8.8 लाख महिलांना कॅन्सरने झाल्याचे आकडेवारीतून समोर येत आहे. 21 व्या शतकात शारीरिक स्वास्थामध्ये कॅन्सर म्हणजेच कर्करोग हे मोठे आवाहन वैद्यकीय क्षेत्रासमोर उभे ठाकले आहे. कॅन्सरचे साधारणपणे चार टप्पे असतात. पहिल्या टप्प्यात कॅन्सरचे निदान झाल्यास त्याला वेळीच औषध उपचार करून बरे करणे शक्य होत आहे. यात विदर्भात सर्वाधिक रुग्णांमध्ये तोंडाच्या कॅन्सरचे रुग्ण मिळत असून, त्याचे प्रमाण 35 टक्के इतके आहे. त्यानंतर महिलांमध्ये 28 टक्के रुग्ण हे स्तन कॅन्सर आणि 26 टक्के गर्भाशयाचे मुखाचे कॅन्सर असल्याचे समोर येत आहे.

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का

Maharashtra Assembly Election Result: भाजप ठरला किंगमेकर! जवळपास ७० टक्के जागा जिंकण्याचा घडविला विक्रम

Lokshahi Marathi Live Update : वायनाड लोकसभा पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा विजय