पृथ्वीवर असलेल्या प्रत्येक जीवाला जगण्याचा अधिकार आहे. मात्र काही विकृतांकडून पृथ्वीवरील दुर्मीळ वृक्ष, दुर्मीळ प्राणी, झाडांच्या प्रजातींची तस्करी करण्यात येते. याला आळा घालण्यासाठी जागतिक पातळीवर प्रयत्न करण्यात आले. संयुक्त राष्टाच्या महासभेने 2013 ला यासाठी विश्व वन्यजीव दिवस 3 मार्चला घोषित केला. त्यानुसार 3 मार्चला दरवर्षी जागतिक वन्यजीव दिन साजरा करण्यात येतो. पृथ्वीवरील प्रत्येक वन्यजीवाला मानवासारखाच राहण्याचा आणि जगण्याचा अधिकार असल्याचे या दिवसातून पटवून देण्यात येते.
जागतिक पातळीवरील नागरिकांचे जीवन जल आणि जंगलावर अवलंबून आहे. मात्र तरीही अनेक जंगली प्राण्यांच्या आणि वन संपती तस्करी करण्याच्या घटना घडत होत्या. त्याला आळा घालण्यासाठी संयुक्त राष्ट्र संघाने 3 मार्च 1973 ला वन्यजीव आणि वनस्पतीच्या व्यापाराला रोखण्यासाठी करारावर ( CITES ) सही केली होती. त्यानंतर थायलंडमधील बँकॉक येथे संयुक्त राष्ट्र संघाचे अधिवेशन 20 डिसेंबर 2013 ला आयोजित करण्यात आले होते. या अधिवेशनात वन्यजीवांच्या तस्करीला रोखण्यासाठी आणि त्याबाबत जनजागृती करण्यासाठी 3 मार्च हा जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा करण्याचे ठरवण्यात आले. तेव्हापासून 3 मार्च हा जागतिक वन्यजीव दिन म्हणून साजरा करण्यात येतो.
युनायटेड नेशन्स जनरल असेंब्लीने (UNGA) 20 डिसेंबर 2013 रोजी आपल्या 68 व्या अधिवेशनात, जगातील वन्य प्राणी आणि वनस्पतींबद्दल जागरुकता निर्माण करण्यासाठी 3 मार्च हा दिवस जागतिक वन्यजीव दिन म्हणून घोषित केला. यामागची पार्श्वभूमू म्हणजे 3 मार्च हा 1973 हा दिवस प्रजातींच्या वन्यजीव आणि वनस्पतींच्या आंतरराष्ट्रीय व्यापारावरील करारावर स्वाक्षरी करण्याचा दिवस देखील आहे.
जागतिक वन्यजीव दिन 2024 ची थीम, “कनेक्टिंग पीपल अँड प्लॅनेट: एक्सप्लोरिंग डिजीटल इनोव्हेशन इन वाइल्डलाइफ कॉन्झर्वेशन,” संरक्षण प्रयत्नांना पुढे नेण्यासाठी तंत्रज्ञानाच्या संभाव्यतेवर प्रकाश टाकते. ही थीम आजच्या डिजिटल युगात विशेषत: संबंधित आहे, जिथे तांत्रिक प्रगती दीर्घकालीन संवर्धन आव्हानांसाठी नवीन उपाय देऊ शकते. डिजिटल टूल्स आणि प्लॅटफॉर्ममध्ये देखरेख आणि संरक्षण प्रयत्न वाढवण्याची, शाश्वत वन्यजीव व्यापार पद्धतींना समर्थन आणि सकारात्मक मानव-वन्यजीव संबंध वाढवण्याची शक्ती आहे.