स्त्रीची मासिक पाळी कायमची बंद होण्याला रजोनिवृत्ती म्हणतात. स्त्रीयांमध्ये वयाच्या 12 ते 14 व्या वर्षी मासिक पाळीला सुरुवात होते. ज्याचा अर्थ स्त्री गर्भधारणेसाठी योग्य आहे, असा होतो. पाळी महिन्यातून एकदा येते व साधारण 45 वर्षे वयापर्यंत चालू राहते. त्यानंतर बीजग्रंथीचे कार्य संपुष्टात येते व बीज उत्सर्जन बंद पडल्यामुळे किंवा बीज ग्रंथीमध्ये आंतररस तयार होणे थांबल्यामुळे, मासिक पाळी कायमची बंद होते. त्याला रजोनिवृत्ती असे महणतात. रजोनिवृत्ती हळूहळू किंवा एकदमच होऊ शकते. रजोनिवृत्ती झाल्यावर स्त्रीमध्ये शारीरिक व मानसिक दोन्ही प्रकारचे बदल घडतात. जागतिक रजोनिवृत्ती दिन दरवर्षी १८ ऑक्टोबर रोजी साजरा केला जातो.
रजोनिवृत्तिची कारणे: रजोनिवृत्ति झाल्यावर स्त्रीच्या शरीरात शारीरिक आणि मानसिक दोन्ही प्रकाराचे पविर्तन होतात. बहुतांश हे परिवर्तन नकळत व अल्प प्रमाणात होत असल्याने, स्त्रीला कोणत्याही प्रकारची अडचण येत नाही. परंतु, काही स्त्रीयांना विशेष त्रासाला सामोरे जावे लागते. रजोनिवृत्तिला इंग्रजीमध्ये मेनोपॉज़ म्हणतात. ज्याचा अर्थ जीवनात परिवर्तन हा आहे. हा काळ वास्तवात स्त्रीच्या जीवनातील परिर्तनकाळ असतो. या काळाचा प्रारंभ झाल्यावर मनामध्ये निरुत्साह, शरीरातील शिथिलता, झोप न येणे, डोके दुखणे तथा शरीरातील भिन्न भिन्न भागात दुखणे अनेक प्रकारची असुविधा, बेचैनी असणे इत्यादी लक्षण प्रकट होतात. बहुतांश महिलांच्या शरीरात स्थूलता येते. आनुवंशिक या वैयक्तिक उन्मादी प्रवृत्तितील महिलांना उन्माद, किंवा पागलपन येण्याची आशंका असते.
रजोनिवृत्तिमुळे होणाऱ्या समस्या: प्रजनन क्रिया समाप्त झाल्यावर प्रजनन अंगांमध्ये अर्बुद-गाठ (Tumor) होण्याचे भय असते. डिंबग्रंथि आणि गर्भाशय दोघांमध्ये अर्बुद उत्पन्न होऊ शकते. गर्भाशय मध्ये घातक आणि प्रघातक दोन्ही प्रकारचे अर्बुदांची प्रवृत्ति असते. मासिकधर्मची गड़बड़ी कैंसरचे सर्वप्रथम लक्षण आहे. जास्त प्रमाणात स्राव होणे, सौत्रार्बुद (Fibroid) होणे, उदराच्या आकाराचे वाढने यामागे देखील गाठी होणे, हे कारण असू शकते. या वेळी गलगंड (goiter) उत्पन्न होण्याची संभावना राहते. भिन्न-भिन्न स्त्रियांमध्ये रजोनिवृत्ति भिन्न भिन्न प्रकाराची होते. काही महिलांचे मासिकधर्म अचानक बंद होते, तर काही महिलांमध्ये हळूहळू एक किंवा दोन वर्षात बंद होते.
रजोनिवृत्तिची लक्षणे : खूप जास्त घाम येणे, जीव घाबरणे, डोके दुखणे, चक्कर येणे, स्वभाव मध्ये चिड़चिड़ापन येणे, शारीरिक कमजोरी येणे, पोटाशी संबंधित समस्या होते, पचनशक्ति कमजोर होते, जीव घाबरणे आणि उल्टियां होणे, लगातार बद्धकोष्ठताची समस्या होऊ शकते. या कालावधीत अनेक स्त्रियांना मानसिक तनावची समस्या येते. काही स्त्रियांमध्ये या कालावधी नंतर शरीरावर सुरकुत्या पडायला सुरुवात होते.