लोकशाही स्पेशल

Shravan Somvar 2024: पहिल्या श्रावण सोमवारी महादेवाला कोणती शिवामूठ वाहावी? जाणून घ्या...

श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. आजपासून श्रावण महिना सुरू झाला आहे.

Published by : Dhanshree Shintre

श्रावण महिना हा अत्यंत पवित्र महिना मानला जातो. आजपासून श्रावण महिना सुरू झाला आहे. तर 2 सप्टेंबर रोजी श्रावण समाप्त होणार आहे. यावर्षीच्या श्रावण महिन्याचं वैशिष्ट्य म्हणजे सोमवार पासूनच श्रावण महिना सुरू होत आहे. या महिन्यात पाच श्रावण सोमवार आले आहेत.

श्रावणाची सुरूवात सोमवारी होणं हे शुभ मानले जात. कारण, भगवान शंकरांचा वार सोमवार आहे. तर 72 वर्षांपूर्वी म्हणजे 10 ऑगस्ट 1953 मध्ये श्रावणाची सुरूवात सोमवारी झाली होती. आता बऱ्याच वर्षांनी हा योग जुळून येत आहे. त्यामुळे यंदाचा श्रावण हा शुभ मानला जात आहे. पहिल्या सोमवारी शिवामूठ तांदूळ वाहावे.

आधुनिक विचारसरणींच्या व्यक्तींना शिवामुठी व्रतामुळे अन्नधान्य नासाडीची चिंता सतवण्याची शक्यता आहे. मात्र पूर्वी महिलांनी अर्पण केलेलं धान्य मंदिराच्या पुजाऱ्याला दिले जायचे. त्यामुळे देण्याचा आनंद अशा व्रतातून अनुभवता येतो. ज्ञान असो वा अन्न हे दिल्यानं ते वाढते. ही आपल्या भारतीय संस्कृतीची शिकवण आहे. अगदी मूठभर असले तरी गृहिणींना आपण ते देऊ शकलो याचं समाधान वाटते. घेणार्‍याला मूठभरातून काही मिळालंय याचं समाधान असते. ज्यांना मंदिरात जाता येत नाही, त्यांनी मूठभर धान्य बाजूला ठेवून शिवाचे स्मरण करावे. त्यात भर घालून गरजूंना ते अर्पण करावे.

विवाहानंतर पहिली पाच वर्षे श्रावण सोमवारी शिवामूठ व्रत केले जाते. श्रावण मासात येणार्‍या चार सोमवारी चार प्रकारचे धान्य शिवाला अर्पण केले जाते. विवाहानंतरची पहिली पाच वर्षे क्रमवार हे व्रत केले जाते. श्रावणातल्या प्रत्येक सोमवारी एकभुक्त राहून शिवलिंगाची पूजा करावी आणि क्रमाने तांदूळ, तीळ, मूग, जवस आणि सातू (पाचवा सोमवार आल्यास त्या दिवशी) या धान्याच्या पाच मुठी देवावर वाहाव्या.

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result