लोकशाही स्पेशल

Maghi Ganesh Jayanti 2024: माघी गणेश जयंती कधी आहे? जाणून घ्या तिथी, मुहूर्त आणि महत्त्व

Published by : Dhanshree Shintre

हिंदू धर्मात, भगवान गणेशाला प्रथम पूजनीय देवतेचे स्थान दिले गेले आहे आणि प्रत्येक महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थीला गणेश चतुर्थी साजरी केली जाते. ग्रेगोरियन कॅलेंडरनुसार गणेश जयंती जानेवारी/फेब्रुवारी महिन्यात येते. माघी जयंतीच्या दिवशी गणपतीची पूजा केली जाते आणि उपवास करण्याची परंपरा देखील आहे. माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला माघी गणेश चतुर्थी म्हणतात आणि माघी चतुर्थीच्या दिवशी गणेशाचा जन्म झाला असे मानले जाते. हा दिवस भारतात मोठ्या थाटामाटात साजरा प्रवेश: केळीजातो. या वर्षी माघी गणेश चतुर्थी आणि पुजेचा शुभ मुहूर्त कधी आहे हे जाणून घेऊया?

माघी गणेश चतुर्थीची तिथी आणि शुभ मुहूर्त

वैदिक दिनदर्शिकेनुसार माघ महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथी 12 फेब्रुवारीला सायंकाळी 5:44 वाजता सुरू होईल आणि 13 फेब्रुवारीला दुपारी 2:41 वाजता समाप्त होईल. उदयतिथीनुसार, मंगळवार, 13 फेब्रुवारी 2024 रोजी माघी गणेश चतुर्थी साजरी केली जाईल. माघी जयंती हा सण प्रामुख्याने महाराष्ट्र आणि कोकणच्या किनारी भागात साजरा केला जातो आणि या दिवशी कुंभ संक्रांती देखील साजरी केली जाते.

माघी गणेश चतुर्थीचे महत्व

माघी महिन्याच्या शुक्ल पक्षातील चतुर्थी तिथीला भगवान गणेशाचा जन्म झाला आणि या दिवशी त्यांची पूजा केल्याने घरात सुख, शांती आणि समृद्धी येते. भगवान गणेशाला बुद्धीचा देवता म्हटले जाते आणि त्यांची पूजा केल्याने करिअर आणि व्यवसायात यश मिळते. असे म्हणतात की ज्या व्यक्तीवर श्रीगणेशाची कृपा असते, त्याच्या जीवनातील सर्व अडथळे दूर होतात. या दिवशी गणपतीला प्रसन्न करण्यासाठी व्रत पाळले जाते आणि पूजा करताना गणपती स्तोत्राचे पठण करणे फायदेशीर मानले जाते.

Israel - Hamas Conflict : इस्रायल-हमास युद्धाला पूर्णविराम? हमासचा म्होरक्या याह्या सिनवार अखेर ठार

Chandrashekhar Bawankule : नांदेड लोकसभा पोटनिवडणूक भाजप लढणार का?; चंद्रशेखर बावनकुळे यांनी सरळ सांगितले...

Bacchu Kadu : 4 नोव्हेंबरला पूर्ण चित्र स्पष्ट होईल, मोठा स्फोट होईल; बच्चू कडू यांचं मोठं वक्तव्य

ललित पाटील ड्रग्ज प्रकरण; आठ आरोपींना जामीन मंजूर

विधानसभा निवडणुकीत विश्व हिंदू परिषद मैदानात