पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील क्वेट्टा येथे झालेल्या ७.७ रिश्टर स्केलच्या भूकंपात ५६ हजार लोक ठार झाले.
सुविचार
आपल्या नियतीचे मालक बना पण परिस्थितीचे गुलाम बनू नका.
आज काय घडले
१९१० मध्ये आफ्रिका खंडातील दक्षिण आफ्रिकेला स्वातंत्र मिळाले. आफ्रिकेने त्यांच्या राज्यघटनेत अकरा भाषा अधिकृत जाहीर केल्या आहेत. परंतु डच भाषेपासून विकसित झालेली आफ्रिकान्स ही भाषा बहुतांश लोक बोलतात.
१९३५ मध्ये पाकिस्तानच्या बलुचिस्तान प्रांतातील क्वेट्टा येथे झालेल्या ७.७ रिश्टर स्केलच्या भूकंपात ५६ हजार लोक ठार झाले.
आज यांचा जन्म
महाराणी अहिल्याबाई होळकर यांचा १७२५ मध्ये जन्म झाला. नगर जिल्ह्यातील जामखेड तालुक्यातील चौंडी या खेड्यात त्यांचा जन्म झाला.
बालसाहित्यकार, विज्ञानकथाकार भास्कर रामचंद्र तथा भा. रा. भागवत यांचा १९१० मध्ये जन्म झाला. मराठीतील पहिल्या बालकुमार साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले.
नाट्यसमीक्षक विश्वनाथ भालचंद्र तथा वि. भा. देशपांडे यांचा १९३८ मध्ये जन्म झाला. त्यांनी मराठी नाट्यकोशात १२०० पानी ग्रंथाचे लिखाण व संपादन करून मराठी कोशवाङ्मयात एक मोलाची भर टाकली आहे.
आज यांची पुण्यतिथी
प्राच्यविद्या पंडित, पुरातत्त्वज्ञ डॉ. रामकृष्ण विठ्ठल तथा भाऊ दाजी लाड यांचे १८७४ मध्ये निधन झाले. ते इतिहास-अभ्यासक, संशोधक, सामाजिक कार्यकर्ते आणि निष्णात डॉक्टर होते.
वैद्यकशास्त्रातील पहिली महिला पदवीधर डॉ. एलिझाबेथ ब्लॅकवेल यांचे १९१० मध्ये निधन झाले.
बनारस घराण्याचे नामवंत तबलावादक पंडित सामताप्रसाद यांचे १९९४ मध्ये निधन झाले. त्यांनी शोले, मेरी सूरत तेरी आँखें सह अनेक हिंदी चित्रपटांमध्ये तबलावादन केले होते.
लेग स्पिनर सुभाष गुप्ते यांचे २००२ मध्ये निधन झाले. त्यांनी कसोटी क्रिकेटमध्ये १४९ बळी घेतले होते.