सुविचार
आव्हानांना सुध्दा...आव्हान पेलू शकणाऱ्यांचीच, प्रतीक्षा असते.
आज काय घडले
१७८५ मध्ये अमेरिकेतील डॉलरला अधिकृत चलनाचा दर्जा देण्यात आला. डॉलर हे चलन पूर्णपणे दशमान पद्धतीवर आधारीत आहे.
१८८५ मध्ये फ्रेंच वैज्ञानिक लुई पास्चर यांनी प्लेगवर शोधलेल्या रेबीजच्या लसीचा पहिल्यांदा वापर केला.
१८९२ मध्ये दादाभाई नौरोजी यांची ब्रिटीश संसदेचे भारतीय सभासद म्हणून निवड केली. ब्रिटीश संसदेवर निवड झालेले ते पहिले भारतीय होते.
२००६ मध्ये चीनयुद्धापासून बंद असलेली भारत तिबेटला जोडणारी नाथूला ही खिंड ४४ वर्षांनंतर व्यापारासाठी खुली झाली.
आज यांचा जन्म
भारतीय विद्वान, संस्कृत विद्या पंडित, प्राच्यविद्या संशोधक इतिहासकार रामकृष्ण गोपाल भांडारकर यांचा १८३७ मध्ये जन्म झाला.
संत व लेखक गुलाबराव महाराज यांचा १८८१ मध्ये जन्म झाला. प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी १३४ ग्रंथ लिहिले.
कायदेपंडित व शिक्षणतज्ज्ञ, भारतीय जनसंघाचे संस्थापक डॉ. श्यामाप्रसाद मुखर्जी यांचा १९०१ मध्ये जन्म झाला.
राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्रसेविका समितीच्या संस्थापिका लक्ष्मीबाई केळकर यांचा १९०५ मध्ये जन्म झाला. समितीच्या वतीने त्यांनी पाळणाघरे, शिशुमंदिरे, आरोग्य केंद्रे असे उपक्रम सुरू केले.
जागतिक कीर्तीचे अर्थतज्ज्ञ डॉ. वि.म. दांडेकर यांचा १९२० मध्ये जन्म झाला. त्यांनी राष्ट्रीय उत्पन्न, प्राथमिक शिक्षणातील त्रुटी, शेतीचा अभ्यास या विषयांचे विश्लेषणात्मक अर्थशास्त्रीय अभ्यास केला.
तिबेटी धर्मगुरु १४वे दलाई लामा यांचा १९३५ मध्ये जन्म झाला. त्यांनी तिबेटी लोकांच्या हितरक्षणासाठी आयुष्यभर कार्य केले.
आज यांची पुण्यतिथी
स्वातंत्र्यसैनिक, समाजसुधारक, केंद्रीय मंत्री आणि उपपंतप्रधान बाबू जगजीवनराम यांचे १९८६ मध्ये निधन झाले.
हिंदी चित्रपट निर्माते, दिग्दर्शक चेतन आनंद यांचे १९९७ मध्ये निधन झाले. नवकेतन फिल्म्सचे ते सहसंस्थापक होते.
भारतीय उद्योगपती, रिलायन्स इंडस्ट्रीजचे संस्थापक धीरूभाई अंबानी यांचे २००२ मध्ये निधन झाले.