ज्यांनी आपल्या अभिनयाची छाप संपूर्ण बॉलीवूड सिनेसृष्टीवर पाडली असे सुपरस्टार अभिनेते विनोद खन्ना यांचा आजच्याच दिवशी जन्म म्हणजे 6 ऑक्टोबर रोजी जन्म झाला होता. भारतीय चित्रपटसृष्टीवर आपल्या अभिनयाची छाप सोडणाऱ्या विनोद खन्ना यांचा जन्म 6 ऑक्टोबर 1946 रोजी पेशावर या ठिकाणी झाला होता. त्यांनी राजकारणात प्रवेश केल्यानंतर गुरुदासपूर या ठिकाणाहून ते लोकसभेत निवडून गेले होते. त्यांनी देशाच्या संरक्षण राज्यमंत्रीपदीही काम केलं आहे.
विनोद खन्नाच्या अभिनयाची सुरूवात 1968 मध्ये 'मन का मीत' या चित्रपटातून झाली. यात त्याने खलनायकाची भूमिका केली होती. त्यानंतर 1971 मध्ये त्याचा पहिला सोलो चित्रपट 'हम तुम और वो' आला. काही वर्ष त्याने चित्रपटांपासून सन्यास घेतला, त्यादरम्यान तो आचार्य रजनीशचा अनुयायी बनला होता, त्यानंतरही त्याने चित्रपट क्षेत्रात पुनरागमन केले आणि आतापर्यंत चित्रपटात सक्रिय आहे. चित्रपट क्षेत्रातील 30 वर्षापेक्षाही जास्त कालावधीच्या कामगिरीमुळे विनोदला 1999 मध्ये फिल्मफेयरचा लाइफटाइम अॅचिव्हमेंट अॅवार्डने सन्मानित करण्यात आले.
हँडसम खलनायक म्हणून प्रसिद्धी
विनोद खन्ना फिल्म इंडस्ट्रीमध्ये निवडक अभिनेत्यांमधून एक आहेत, ज्यांनी खलनायकापासून ते नायकापर्यंत प्रत्येक प्रकारच्या भूमिका निभविल्या आहेत. जानकारांच्या मते ‘मेरा गाव मेरा देश' मध्ये विनोद खन्ना एवढे हँडसम दिसत होते की, बश्याच मुली त्यांच्या ह्या रुपावर फिदा झाल्या होत्या. पहिल्या चित्रपटापासून विनोद यांना चांगला रिस्पॉन्स मिळाला आणि एकाच महिन्यात एकापाठोपाठ 15 चित्रपट साइन केले. त्यानंतर सच्चा और झूठा, पूरब पश्चिम, आन मिलो सजना आणि मस्ताना सारख्या चित्रपटांद्वारे विनोद खन्ना सुपर सेक्सी खलनायक म्हणून प्रसिद्धीस आले. मन का मीत सुपरहिट झाल्यानंतर विनोद खन्नाने 1971 मध्ये गीतांजलीशी प्रेमविवाह केला होता. त्यानंतर गीतांजलीला विनोदचे राहुल व अक्षय असे दोन मुले झाली.
1975 मध्ये विनोद खन्ना ओशोच्या संपर्कात आले व लवकरच ओशोचे शिष्य झाले. हळुहळु विनोद एवढे प्रभावित झाले की, 1980 मध्ये त्यांनी फिल्म इंडस्ट्रीपासून सन्यास घेतला. आणि अमेरिकेच्या ओशो आश्रमात चालले गेले. विनोदने जेव्हा सन्यासी बनण्याची इंडस्ट्रीमध्ये सन्यास घेण्याची घोषणा केली तर त्यांना सेक्सी सन्यासीची उपमा दिली गेली. त्यांच्या मुलांना शाळेत चिडवू लागले की, तुमचे वडील ओशोसोबत पडून गेले. एकदा स्वतः मुलाखतीत विनोदने जाहीर केले की, ओशोच्या आश्रमात माळीचे काम आणि टॉयलेटची सफाई करतो असे. ओशोच्या सन्यासानंतर गीतांजली एकटी पडली आणि विनोदशी तिने घटस्पोट घेतला.
पाच वर्ष रजनीशपुरममध्ये राहिल्यानंतर विनोद अमेरिकाहून मुंबई परतले. कारण ते आश्रमच्या जीवनाला कंटाळले होते. ते आपल्या मुलांजवळ वापस आले आणि पून्हा इंडस्ट्रीमध्ये काम सुरु केले. त्यानंतर 1990 मध्ये विनोदने कविताशी लग्न केले. मुलगा साक्षी आणि मुलगी श्रद्धा असे दोन मुलांना कविताने जन्म दिला. राजकारणाबरोबरच सध्या विनोद खन्ना चित्रपटातही सक्रिय आहे. सलमान खान अभिनित दबंग आणि दबंग 2 मध्ये विनोदचा अभिनय पाहावयास मिळतो. विनोद खन्ना बयाचवेळा मंत्रीदेखील झाले आहेत आणि 2014 पासून पून्हा गुरदासपुर येथून निवडून आले आहेत.