मोबाईलचे (mobile) अनेक फायदे आहेत आणि तितके नुकसानही. जास्त वेळ मोबाईल वापरल्यास आरोग्याला हानी पोहोचते. दिवसभर फोन वापरल्यानंतरही आपण रात्रीही फोन सोडत नाही. उशिरापर्यत फोन वापरल्याने मानसिक आरोग्याला हानी पोहचते. तसेच अपूर्ण झोप रक्तदाब, ह्रद्यरोग आणि मधुमेहासारख्या गंभीर आजारांना निमंत्रण देते व (sleep) निद्रानाशेचा त्रास होऊ शकतो.
आपल्या दिनचर्येवर झोपेचा खूप प्रभाव असतो. कोरोनाकाळात झोप न लागणे, अपूर्ण होणे अशा तक्रारींमध्ये वाढ झाली आहे. या काळात ऑनलाइन Online शिक्षण, वर्क फ्रॉम होममुळे (work from home) तरुणांमध्ये मोबाईलचा वापर मोठ्याप्रमाणात झाला. त्यामुळे विविध आजार आढळून येत आहेत.