उन्हाळा (Summer) सुरू झाला आहे. तापमानात (temperature) खूप वाढ होत आहे. पैठण (Paithan) शहरासह ग्रामिण भागात 38 डिग्रीपेक्षा जास्त तापमान आहे. या वाढत्या तापमानाचा शरीरावर नक्कीच खूप मोठा परिणाम होतो. तापमान बदलामुळे थकवा येणे, डोकेदुखी, चक्कर, डिहायड्रेशन, घामोळे येणे, उष्माघात, मूतखडा, उन्हाळा लागणे, लघवीला जळजळ होणे, ॲसिडीटी, उलट्या, जुलाब होणे, भूक मंदावणे, ब्लडप्रेशर कमी जास्त होणे, इत्यादी त्रास होतात. यावर सहज सोप्या पद्धतीने काही उपाय केल्यास या गोष्टी टाळता येतील. सर्वप्रथम शरीराचे तापमान कमी करण्यासाठी भरपूर पाणी प्यावे. असे आव्हान निम्बार्क (Nimbark) हॉस्पिटलचे डॉ.सुनिल गायकवाड (Dr. Sunil Gaikwad) यांनी केले आहे.
उन्हाळ्यात हे घ्यावे
थंड पाणी प्यावे. शक्यतो माठातील पाणी प्यावे. त्यामध्ये धने,तुळस, पुदिना, मोगरा हे टाकल्यास उत्तम. ते थंडावा देते. पाण्यासोबत पाणीदार फळांचे सेवन करावे. यामध्ये द्राक्षे, कलिंगड, टरबूज, काकडी, संत्री, मोसंबी, डाळिंब इत्यादी घ्यावे. सरबते, लिंबू, कोकम, आवळा, कैरीचे पन्हे, उसाचा रस, नारळपाणी यामधील अँटी ऑक्सिडेंट गुणधर्म प्रतिकार शक्ती वाढण्यासाठी मदत करतात. कांद्याचे सेवन करावे. कांदा तापमान कमी करण्यासाठी खूप फायदेशीर आहे.
उन्हाळ्यात हे घेऊ नये
तेलकट पदार्थ, तळलेले, मसालेदार, मैद्याचे पदार्थ, नॉनव्हेज, हॉटेलचे पदार्थ खाऊ नयेत. तसेच आईस्क्रीम, कोल्डक्रिम, कोल्डड्रिंक्स, चहा, कॉफी, टाळावे.