लोकशाही स्पेशल

सिंधुताई सपकाळ 'हे' प्रेरणादायी विचार देतील जीवनाला दिशा

ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य अनाथ मुलांसाठी वेचलं अशी मूर्तिमंत अनाथांची आई म्हणजेच सिंधुताई सपकाळ. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या सिंधुताईंचे प्रेरणादायी विचार...

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Sindhutai Sapkal Death Anniversary : महाराष्ट्रात अशी एक व्यक्ती होऊन गेली जिने अनाथ मुलांना आपलंस केलं, मातृत्वाचा झरा बनून ती लाखो लेकरांची आई बनली. त्यांनी या मुलांचे फक्त संगोपनच केले नाही तर त्यांना जगण्याची नवी उमीद दिली, मार्ग दाखवला. त्यांच्या या प्रवासाचा मार्ग काटेरी वाटांनी, अनेक अडथळयांनीं आणि समस्यांनी भरलेला होता. ज्यांनी आपलं संपूर्ण आयुष्य अनाथ मुलांसाठी वेचलं अशी मूर्तिमंत अनाथांची आई म्हणजेच सिंधुताई सपकाळ. त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त जाणून घ्या सिंधुताईंचे प्रेरणादायी विचार...

जर तुम्हाला स्वतःसाठी जगायचे नसेल तर इतरांसाठी जगायला शिका.

- सिंधुताई सपकाळ

माझं पुस्तक दहावीच्या अभ्यासक्रमाला कर्नाटकात आहे पण महाराष्ट्रात नाही कारण या महाराष्ट्रात मोठं व्हायचं असेल तर मरावं लागतं.

- सिंधुताई सपकाळ

जीवनात कधी संकटे आली तर त्यांच्यावर पाय देऊन उभे रहा, त्यामूळे संकटांची उंची कमी होईल.

- सिंधुताई सपकाळ

मला जीवन जगण्याचा मार्ग आणि आत्मविश्वास स्मशानभूमीतून मिळाला.

- सिंधुताई सपकाळ

माणूस कधीचं वाईट नसतो. माणसाच्या पोटाची भूक वाईट असते.

- सिंधुताई सपकाळ

Manoj Jarange Patil : जरांगे फॅक्टर का चालला नाही? मनोज जरांगे थेट म्हणाले...

डोळ्यांची सतेजता आणि शक्तीसाठी हिरडा ठरेल गुणकारी...

Dark circles: डोळ्याखालील ब्लॅक सर्कल तयार झाले आहेत? ब्लॅक सर्कलवर "हे" उपाय हमखास ट्राय करा

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result