राजर्षी छत्रपती शाहू महाराज यांची आज २६ जून रोजी जयंती आहे. पुरोगामी विचारांचे पुरस्कर्ते असणार्या राजर्षी छत्रपती शाहू महाराजांनी शैक्षणिक, सामाजिक, आर्थिक स्तरावर काळाच्या एक पाऊल पुढे विचार केल्याने आणि त्यानुसार समाजाची घडी बसवल्याने आजही जनसामान्यांमध्ये त्यांच्याबद्दल आदर आणि प्रेम कायम आहे.
शाहू महाराजांचा जन्म हा कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्याचं मूळ नाव यशवंत असे होते. कोल्हापूर संस्थानचे चौथे शिवाजी महाराज यांचे निधन झाल्यानंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी 1884 झाली यशवंत यांना दत्तक घेतले आणि त्याचं नावं 'शाहू' असे ठेवले. पुढे त्यांच्या राज्याभिषेकानंतर 28 वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते.
जयंतीनिमित्त महाराष्ट्रातील त्यांच्या विचारांचा पुरस्कार करणार्या तमाम जनतेला शुभेच्छा देण्यासाठी व्हॉट्सअॅप (WhatsApp Status), फेसबूकच्या स्टेट्सच्या (Facebook Status) माध्यमातून शाहू महाराज जयंतीच्या शुभेच्छा देण्यासाठी मराठमोळी शुभेच्छापत्र(Wishes) , मेसेजेस (Messages), ग्रिटिंग्स (Greetings) देऊन आजचा दिवस साजरा करू.
शाहू महाराज जयंती शुभेच्छा
समता, बंधुता यांची शिकवण देणारा
लोकराजा छत्रपती शाहू महाराज यांना
जयंती निमित्त त्रिवार अभिवादन
बहुजन समाजाला स्वाभिमानाचे नवं जीवन देणार्या लोकराजा राजर्षी शाहू महाराज यांना मानाचा मुजरा!
भटक्या, विमुक्त जमातींचे आधारस्तंभ
छत्रपती राजर्षी शाहू महाराज यांच्या
जयंती निमित्त अभिवादन!