पाच राज्यातील विधानसभा निवडणुकांचे निकाल (assembly election result 2022) आज जाहीर झाले. यामध्ये पंजाबमध्ये आपच सरदार ठरले तर उत्तरप्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये भाजपचे सरकार येणार असल्याची शक्यता आहे.
5 राज्याच्या निवडणुकीत अनेक दिग्गज नेत्यांचा पराभव झाला..या निवडणुकीत 2 मुख्यमंत्री, 2 उपमुख्यमंत्री , 3 माजी मुख्यमंत्र्याचा आणि अनेक दिग्गज नेत्यांना पराभवला सामोरे जावं लागलं..पंजाबचे मुख्यमंत्री चरणजीतसिंह चन्नी, उत्तराखंड मुख्यमंत्री पुष्कर धामी, माजी मुख्यमंत्री हरिश रावत, गोव्याचे दिवगंत माजी मुख्यमंत्री मनहोर पर्रिकर यांचे पुत्र उत्पल पर्रिकर, गोव्याच्या दोन्ही उपमुख्यमंत्री बाबू उर्फ चंद्रकांत कवळेकर बाबू उर्फ मनोहर आजगावकर यांच्यासह माजी मुख्यमंत्री कॅप्टन अमरिंदर सिंह, सुखबीर सिंग बादल, प्रकाश सिंह बादल, नवजोत सिंह सिद्धू अभिनेता सोनू सुद यांची बहिणींचा पण पराभव झाला..
या निकालाचा अन्वयार्थ समजून घेऊ या १५ मुद्यांमधून…
१)गोव्यातील विजयामुळे देवेंद्र फडणवीस यांचे पक्षातील वजन वाढणार आहे. उत्पल पर्रिकरसारख्या पक्षातील नेत्याविरोधातही त्यांची रणनीती यशस्वी ठरली.
२)उत्तर प्रदेशातील विजयामुळे शेतकरी आंदोलनाचा कुठलाही फटका भाजपला बसला नाही, हे स्पष्ट झाले.
३)पंजाबमधील घवघवीत यशामुळे आपची राष्ट्रीय पक्ष होण्याकडे वाटचाल सुरु झाली आहे. २०२४ नंतर नरेंद्र मोदी यांना टक्कर देणारा नेता म्हणून अरविंद केजरीवाल यांचे नाव पुढे येऊ शकते.
४)पाच राज्यांतील निकालांनुसार बसपाने आपले अस्तिस्त्व गमावले आहे. यामुळे देशातील एक मजबूत दलित चळवळ अस्तंगत होते आहे.
५)काँग्रेस पक्ष अधिकाधिक कमजोर होत आहे. पंजाबसारखे राज्य काँग्रेसकडून गेले आहे. काँग्रेस हायकमांडचे अनेक निर्णय पक्षाच्या पीछेहाटीला जबाबदार आहे. देशातील मुख्य विरोधी पक्ष म्हणून काँग्रेस वेगाने आपले अस्तित्व गमावत चालले आहे.
६) 2022 च्या यूपी विधानसभा निवडणुकीत काँग्रेसने प्रियांका गांधींच्या नेतृत्वाखाली सर्व 403 जागांवर उमेदवार उभे केले. 'लडकी हूँ, लड सकती हूँ' अशा घोषणा देत प्रियांका गांधी यांनी 40% महिलांना तिकिटे दिली. मात्र, गेल्या विधानसभा निवडणूक निकालापेक्षाही काँग्रेसची कामगिरी वाईट झाली. पक्ष 403 जागांपैकी केवळ 2 जागांवर आघाडीवर आहे.
७)निकालनंतर बसपा नेते मायावती आणि काँग्रेसचे प्रियांका, राहुल गांधी यांच्या नेतृत्वावावर व्यापक प्रश्नचिन्ह उभे झाले आहेत.
निकालामुळे विरोधी पक्षाला कॉन्फिडन्स आणि एकजूट टिकवणे कठीण.
८) पाच राज्यांतील निकालामुळे भाजपचा आत्मविश्वास वाढला आहे. यामुळे महाराष्ट्रात भाजप मविआ सरकार पाडण्यासाठी अधिक वेगाने हालचाली सुरु करेल.
९) अमरिंदर सिंग,सिद्धू, चन्नी आणि प्रकाश सिंग बादल या पंजाबच्या बड्या नेत्यांचा पराभवामुळे पंजाबच्या जनतेने परंपरागत नेत्यांना बाजूला सारले आहे.
१०)पंतप्रधान नरेंद्र मोदी सत्तेवर येण्यापुर्वी म्हणजे २०१४ मध्ये भाजप ७ राज्यांत सत्तेवर होता. आता त्यांच्या कार्यकाळात १८ राज्यांत सत्तेवर आला आहे.
११) पाच राज्यांपैकी ४ राज्यात भाजपची सरशी, उत्तर प्रदेश, गोवा, उत्तराखंडात भाजपने सत्ता राखली, मणीपूरमध्ये भाजप आघाडीला यश, तर पंजाबमध्ये आपचा अनपेक्षित चमत्कार
१२) पाच राज्यात मिळून काँग्रेसला १०० जागाही जिंकता आल्या नाहीत, अंतर्गत कलहात पंजाबमधील सत्ता काँग्रेसने गमावली, उत्तर प्रदेशात प्रियांका गांधींच्या तुफान प्रचारानंतरही काँग्रेस प्रभावहीन
१३) दिल्लीनंतर आपने पंजाब काबिज केलं. गोव्यातही आपने खातं उघडलं, आपचं पुढचं लक्ष गुजरात, हरियाणा, देशभरात पक्ष वाढवण्याचे केजरिवालांचे संकेत
१४) पाच राज्यातील निकालांमुळे भाजपविरोधी पक्षांच्या मनोबलावर परिणाम होणार , २०२४ च्या लोकसभा निवडणुकीसाठी भाजपविरोधात देशव्यापी आघाडी बनवण्याच्या प्रयत्नांना खीळ बसण्याची शक्यता
१५) अनेक दिग्गजांना निवडणुकीत पराभवाचा फटका, पंजाबमध्ये नवज्योतसिंग सिद्धु, मुख्यमंत्री चरणजीतसिंग चन्नी यांचा पराभव, तर गोव्यात उत्पल्ल पर्रिकरही पराभूत