लोकशाही स्पेशल

प्रख्यात दिग्दर्शक, निर्माते मधूर भांडारकर यांची स्टार ‘कू’ वर एन्ट्री

Published by : Team Lokshahi

कू'वर चाहत्यांसोबत रंगणार रुपेरी पडद्यावरच्या चर्चा

वास्तववादी सिनेमांमुळे चर्चेत असलेले दिग्दर्शक, निर्माते आणि पटकथा लेखक मधूर भांडारकर (Madhur Bhandarkar) यांनी नुकताच बहुभाषिक मायक्रो-ब्लॉगिंग प्लॅटफॉर्म 'कू' (Koo) जॉइन केला आहे. आजवर अनेक हिट सिनेमे दिलेले लोकप्रिय दिग्दर्शक (Director) भांडारकर असंख्य सन्मानांनाही पात्र ठरलेले आहेत.
'कू' देत असलेल्या बहुभाषिक सुविधांचा प्रभावी उपयोग करून भांडारकर भारतीय युजर्सशी कनेक्ट होतील. आपल्या सिनेजगतल्या कामगिरीसह आगामी रंजक प्रकल्पांबाबतची माहितीही ते चाहत्यांशी आवर्जून शेअर करतील. आणि लोकानां मनोरंजन (Entertainment )करतील.


'कू' जॉइन केल्यानंतरचा आनंद व्यक्त करण्यासाठी भांडारकर यांनी खास पोस्ट (Post) केली आहे. त्यात ते म्हणतात, "हॅलो इंडिया, आता मी दाखल झालोय भारताचे आपले खास अॅप असलेल्या 'कू' वर तुम्ही मला @imbhandarkar वर फॉलो करू शकता. इथे माझे आगामी चित्रपट, भटकंतीचे कथा-किस्से आणि अध्यात्मिक प्रवासाबाबत जाणून घेऊ शकता." यासह भांडारकर यांनी एक 14 सेकंदांचा व्हिडिओही पोस्ट केला आहे. यात ते एका हिरव्यागार शेताच्या कडेने चालताना दिसत आहे. व्हीडिओत 'अभी कुछ दिनों से लग रहा है बदले बदले से हम है…' या सुंदर गाण्याची धुन पार्श्वसंगीत म्हणून वाजताना ऐकू येते.

Marathwada Region Election Result 2024 : मराठवाड्यात जरांगे फॅक्टर कमी पडले का?

Maharashtra Vidhan Sabha Result 2024 LIVE : राज ठाकरेंना सर्वात मोठा धक्का; अमित ठाकरे तिसऱ्या स्थानावर

Kolhapur District Assembly Constituency : पहिल्या कलामध्ये जिल्ह्यात महायुतीची आघाडी!

Election Commission | निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर गोंधळ, काँग्रेस आणि ठाकरे गटाचा कॉलमचं नाही

Ajit Pawar | Baramati | बारामतीत अजित पवार आघाडीवर, युगेंद्र पवार पिछाडीवर | Lokshahi News