लोकशाही स्पेशल

Rakshabandhan 2024: 'या' कारणासाठी साजरा केला जातो रक्षाबंधन; जाणून घ्या...

भारतीय संस्कृतीत प्रमुख सणामध्ये 'रक्षाबंधन' हा सण भाऊ-बहिणीचा स्नेह व उत्सवाचे पर्व म्हणून साजरा केला जातो.

Published by : Dhanshree Shintre

भारतीय संस्कृतीत प्रमुख सणामध्ये 'रक्षाबंधन' हा सण भाऊ-बहिणीचा स्नेह व उत्सवाचे पर्व म्हणून साजरा केला जातो. देशभरात ह्या सणाची वेगवेगळ्या नावाने ओळख आहे. उत्तर भारतात 'कजरी-पौर्णिमा', पश्चिम भारतातात 'नारळी पौर्णिमा' या नावाने तो साजरा केला जातो.

इंद्र दानवांकडून पराजीत झाले होते. तेव्हा त्यांच्या उजव्या हातावर त्यांची पत्नी इंद्राणीने रक्षासूत्र बांधले होते. त्याने इंद्रदेवाचा आत्मविश्वास वाढला होता. त्यानंतर त्यांनी दानवावर विजय मिळवला होता अशी पौराणिक कथा आहे. तसेच महाभारतात श्री कृष्‍णाच्या हाताच्या बोटाला जखम होऊन त्यातून रक्त वाहत होते. तेव्हा पांडवांची पत्नी द्रौपदीने आपल्या साडी किनार फाडून श्रीकृष्‍णाच्या बोटाला बांधून दिले होते. तेव्हापासून श्री कृष्णाने द्रोपदीचे रक्षण करण्‍याचा संकल्प केला होता व आजीवन त्यांनी द्रौपदीचे रक्षण केले.

भारतीय इतिहासात रक्षाबंधन संदर्भात अनेक उदाहरणे आहेत. चित्तौढगडची राणी कर्मावतीने बहादुरशाहपासून स्वत:ची रक्षा करण्यासाठी मुघल हुमायूला राखी बांधल्याचे उदाहरण आहे. हुमायूने राणीच्या रक्षणासाठी प्राणाची बाजी लावली होती.

पौराणिक कथा आणि इतिहास चाळता रक्षाबंधन या सणात काळानुरुप अनेक बदल झालेला आढळतो. आता हे पर्व भाऊ-बहिणींच्या नात्याचे, प्रेमाचे, स्नेहाचे आणि बंधनाचे पर्व म्हणून देशात साजरे होतात. त्यात बहिण आपल्या भावाच्या उजव्या हातावर राखी बांधते आणि भाऊ आपल्या लाडक्या बहिणीच्या रक्षणाचे दायित्व स्वीकारत असतो. काळ बदलला असला तरी आज माहिती तंत्रज्ञानाच्या युगात भाऊ- बहिणींच्या स्नेहाचा 'रक्षाबंधण' या सणाचे महत्त्व कायम आहे.

अवघ्या २०८ मतांनी नाना पटोले यांचा विजय

Eknath Shinde Kopari Vidhansabha: कोपरी-पाचपाखडीतून एकनाथ शिंदेंचा विजय, ठाण्यात कार्यकर्त्याचा जोरदार जल्लोष

...म्हणून महाविकास आघाडीला विरोधी पक्षनेतेपद मिळणंही अवघड

Raj Thackarey On Vidhansabha: मनसेचा विधानसभेत दारूण पराभव; राज ठाकरेंकडून सूचक ट्विट

PM Modi: सर्व राज्यात काँग्रेसची पिछेहाट सुरू- पंतप्रधान मोदी