लोकशाही स्पेशल

Rajmata Jijau Punyatithi 2023 : राजमाता जिजाऊंच्या पुण्यतिथीनिमित्त मानाचा मुजरा!

हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाबाई यांची 17 जून रोजी आहे.

Published by : Shweta Shigvan-Kavankar

Rajmata Jijabai Punyatithi Messages in Marathi : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मातोश्री राजमाता जिजाबाई यांची 17 जून रोजी आहे. राजमाता जिजाऊंना या निमित्त सर्व मराठमोठ्या जनतेकडून मानाचा मुजरा आणि त्यांनी केलेल्या कार्याला सलाम. राजमाता जिजाऊंचा जन्म 12 जानेवारी 1598 मध्ये बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा येथे झाला. शिवरायांच्या राज्याभिषेकानंतर बारा दिवसांनी 17 जून 1664 साली जिजाऊंनी रायगडाच्या पायथ्याशी असलेल्या पाचाड गावी अखेरचा श्वास घेतला. राजमाता जिजाबाई यांच्या पुण्यतिथी निमित्त मराठी शुभेच्छा शेअर करत करा कोटी कोटी प्रणाम!

जिजाऊ तुम्ही नसता तर,

नसते राहिले शिवबा अन शंभू छावा.

जिजाऊ तुम्ही नसता तर,

नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा!

राजमाता जिजाऊंच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

मुजरा माझा माता जिजाऊंना,

जिने घडविले शुर शिवबाला.

साक्षात होती ती आई भवानी,

जिच्या पोटी जन्म घेतला शिवबांनी!

राजमाता जिजाऊंच्या स्मृतिदिनी विनम्र अभिवादन!

स्वराज्याचा जिने घडविला विधाता,

धन्य ती स्वराज्याची जननी जिजामाता.

जय जिजाऊ...!

जिजाऊ तुम्ही नसता तर,

नसते राहिले शिवबा अन शंभू छावा.

जिजाऊ तुम्ही नसता तर,

नसता मिळाला स्वराज्याचा ठेवा!

जिजाऊ…

ज्यांच्या प्रेरणेने उजळली स्वराज्यज्योती

याच माऊली ज्यांनी घडवले श्री शिवछत्रपती

राजमाता जिजाबाईंना आदरांजली !

Shivsena: शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

Lokshahi Marathi Live Update : शिवसेनेच्या गटनेतेपदी एकनाथ शिंदेंची निवड

निकालातून बोध घेऊन नक्कीच आत्मपरीक्षण करू: सुप्रिया सुळे

IPL Mega Auction 2025 Live: महायुतीकडून सरकार स्थापन करण्यात विलंब होणार?

Oath Ceremony | 26 तारखेपूर्वी शपथविधी होणे बंधनकारक नाही; विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांची माहिती