Admin
लोकशाही स्पेशल

पुलावामा हल्ल्याला आज चार वर्ष पूर्ण; जाणून घ्या 14 फेब्रुवारी 2019 ला नेमकं काय घडलं होतं

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा हल्ल्याला आज चार वर्षे पूर्ण होत आहेत.

Published by : Siddhi Naringrekar

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा हल्ल्याला आज चार वर्षे पूर्ण होत आहेत. 14 फेब्रुवारी 2019 रोजी, जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्गावरून सुमारे 2500 जवानांना घेऊन सीआरपीएफचा ताफा 78 बसमधून जात होता. त्या दिवशीही रस्त्यावर सामान्य वाहतूक होती. सीआरपीएफचा ताफा पुलवामाला पोहोचला होता, तेव्हा रस्त्याच्या पलीकडून येणारी एक कार सीआरपीएफच्या ताफ्यासोबत जाणाऱ्या वाहनावर आदळली. कार ताफ्याला धडकताच तिचा स्फोट झाला आणि या प्राणघातक हल्ल्यात 40 सीआरपीएफ जवान शहीद झाले.

आज जगभरात 14 फेब्रुवारी हा दिवस 'व्हेलेंटाईन डे' म्हणून साजरा केला जात असताना भारताच्या इतिहासात या दिवसाची नोंद काळा दिवस म्हणून आहे.पुलवामा जिल्ह्यातील अवंतीपोराजवळील लेथपोरा भागात झालेल्या हल्ल्याची जबाबदारी पाकिस्तानची दहशतवादी संघटना जैश-ए-मोहम्मदने घेतली. त्यानंतर भारताने अवघ्या 12 दिवसांत 'नापाक' पाकिस्तानकडून बदला घेतला. भारताने 26 फेब्रुवारीला बालाकोट एअर स्ट्राइक करून जैश-ए-मोहम्मदच्या दहशतवाद्यांचा खात्मा केला.

14 फेब्रुवारी 2019 रोजी सकाळी पाकिस्तानच्या दहशतवाद्यांनी CRPF च्या बसवर हल्ला केला होता. त्यावेळी बसमधून प्रवास करत असलेले 40 CRPF जवान शहीद झाले. या घटनेने संपूर्ण देश हादरला. या भ्याड हल्ल्यामागे जैश-ए-मोहम्मद या पाकिस्तानी दहशतवादी संघटनेचा हात होता. या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारतीय लष्कराने पाकव्याप्त काश्मीरमध्ये सर्जिकल स्ट्राइक केला.

Lokshahi Marathi Live Update : रणजितसिंह मोहिते पाटील यांची पक्षातून हकालपट्टी करा- राम सातपुते

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार ? | Marathi news

Shirkant Shinde On Uddhav Thackarey | 'लोकांना काम करणारं सरकार पाहिजे, घरी बसणारं नाही' Vidhansabha

वायनाड पोटनिवडणुकीत प्रियंका गांधींचा घवघवीत यश; मोडला राहुल गांधी यांचा रेकॉर्ड

Maharshatra Vidhansabha Result | राज्यात महायुतीला घवघवीत यश; मविआला मात्र मोठा धक्का