लोकशाही स्पेशल

पुलवामा… एक भ्याड हल्ला

Published by : Lokshahi News

लोकशाही न्यूज नेटवर्क | पुलवामामधील भयंकर दहशतवादी हल्ला कुणीही विसरणार नाही. याच भयानक दहशतवादी हल्ल्याला आज दोन वर्ष पूर्ण झाले आहे.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा जिल्ह्यात 14 फेब्रुवारी 2019 रोजी मोठा दहशतवादी हल्ला झाला होता. या भ्याड हल्ल्यात सीआरपीएफचे 44 जवान शहीद झाले होते तर अनेक जवान जखमी झाले होते.

त्या दिवशी नेमके काय घडले होते? याचा संक्षिप्त आढावा

  • सीआरपीएफच्या 70 गाड्यांच्या ताफ्यात 2 हजार 547 जवान होते. याच ताफ्यावर दहशतवादी हल्ला करण्यात आला.
  • सीआरपीएफ जवानांच्या बसला स्कॉर्पिओ गाडीने धडक दिली. या गाडीत 350 किलोग्रॅम इतकी स्फोटकं होतं.
  • जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेने पुलवामा हल्ल्याची जबाबदारी घेतली होती.
  • जैश-ए-मोहम्मदचा दहशतवादी आदिल अहमद दार उर्फ वकास याने सुसाईड बॉम्बर बनून हा भ्याड हल्ला केला.
  • पुलवामा हल्ल्यात शहीद झालेले जवान 92, 17, 54, 82, 61, 21, 98, 118, 76, 45, 3 आणि 176 या बटालीयनचे होते.
  • या हल्ल्यामुळे जम्मू-काश्मीरमधील इंटरनेट सेवा बंद करण्यात आली होती.

●उरीमध्ये सप्टेंबर 2016 मध्ये झालेल्या हल्ल्यानंतर हा आतापर्यंतचा सर्वात मोठा दहशतवादी हल्ला आहे.

Lokshahi Marathi Live Update : संसदेच्या हिवाळी अधिवेशनापूर्वी आज सर्वपक्षीय बैठक

Sanjay Raut : महाराष्ट्रातील गुजराती लॉबीसाठी सर्वांना एकत्र यावं लागेल | Vidhansabha Result

Sanjay Raut :इतिहास चंद्रचुड नायडूंना माफ नाही करणार | Maharashtra Vidhansabha Result

Malshiras Vidhansabha |'रणजितसिंह मोहिते पाटलांची पक्षातून हकालपट्टी करा'; भाजपची मागणी

Vidhansabha Result 2024 | महायुतीत भाजपच मोठा भाऊ; मुख्यामंत्रीपद भाजपला भेटणार? | Marathi news